Kidneys Infection | किडनी इन्फेक्शनच्या समस्येवर रामबाण इलाज ठरू शकतात ‘हे’ घरगुती उपाय

Kidneys Infection | टीम महाराष्ट्र देशा: किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी किडनीचे निरोगी राहणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकवेळा संक्रमित अन्न आणि प्रदूषित पाणी प्यायल्याने किडनीला इन्फेक्शन होण्याची शक्यता निर्माण होते. किडनी इन्फेक्शनच्या समस्येवर योग्य वेळी उपचार घेतले नाही, तर त्याचे मानवी शरीराला घातक परिणाम भोगावे लागू शकतात. अशावेळी हे इन्फेक्शन टाळण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही यासाठी काही घरगुती उपाय करू शकतात. किडनी इन्फेक्शनच्या समस्येवर पुढील घरगुती उपाय रामबाण इलाज ठरू शकतात.

ॲपल व्हिनेगर

किडनी इन्फेक्शनच्या समस्येवर ॲपल व्हिनेगर एक रामबाण उपाय ठरू शकतो. कारण यामध्ये बॅक्टेरियाशी लढण्यासाठी लागणारे घटक माफक प्रमाणात आढळून येतात. यासाठी तुम्हाला एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा ॲपल व्हिनेगर मिसळून प्यावे लागेल. याचे सेवन केल्याने शरीरातील विषाणू पदार्थ निघून जाण्यास मदत होते. परिणामी तुमचे किडनी इन्फेक्शन कमी होते.

क्रॅनबेरी ज्यूस

क्रॅनबेरी ज्यूसचे सेवन केल्याने किडनी इन्फेक्शनची समस्या दूर होऊ शकते. कारण यामध्ये विटामिन्स, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळून येतात. हे गुणधर्म शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. किडनी इन्फेक्शन टाळण्यासाठी क्रॅनबेरी ज्यूसचे योग्य प्रमाणातच सेवन करावे. कारण याचे अति सेवन केल्याने शरीराला हानी पोहोचण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

लसूण

किडनी इन्फेक्शनची समस्या निर्माण झाल्यास, तुम्ही लसणाचे सेवन करू शकतात. लसूण शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. त्याचबरोबर नियमित लसणाच्या सेवनाने किडनीची कार्य करण्याची पद्धती सुधारते. किडनी इन्फेक्शनपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी 2 ते 3 लसणाच्या पाकळ्याचे सेवन करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.