CNG Cars | लवकरच लाँच होऊ शकतात ‘या’ लोकप्रिय कार्सचे सीएनजी व्हर्जन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

CNG Cars | टीम महाराष्ट्र देशा: देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत चालली आहे. त्यामुळे आता लोक पेट्रोल आणि डिझेल टाळण्यासाठी इतर पर्याय शोधत आहे. CNG कारचा पर्याय लोकांना एक सर्वोत्तम मार्ग वाटत आहे. कारण CNG वाहने लोकांना अनेक फायदे देत आहे. यामध्ये किमतीपासून मायलेजपर्यंत सर्वच गोष्टींचा फायदा होतो. कारण पेट्रोल-डिझेल कारपेक्षा सीएनजी कारची किंमत कमी असते. अशा परिस्थितीत कार उत्पादक कंपन्या त्यांच्या सध्याच्या मॉडेल्सचे सीएनजी व्हर्जन बाजारात लाँच करू शकते. कारण अनेक कार उत्पादक कंपन्यांनी ऑटो एक्सपो 2023 मध्ये त्याच्या सीएनजी कारचे मॉडेल सादर केले आहेत. बाजारामध्ये पुढील गाड्यांचे सीएनजी व्हर्जन दाखल होऊ शकते.

मारुती ब्रेझा सीएनजी

देशाची आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी लवकरच आपली ब्रेझा एसयुव्ही सीएनजी अवतारामध्ये लाँच करू शकते. या कारमध्ये 1.5L Bi-Fuel सीएनजी इंजिन मिळू शकते. हे इंजिन 86.7bhp पॉवर आणि 121 टार्क निर्माण करू शकते. या कारमध्ये 5 किंवा 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गेअर बॉक्स उपलब्ध असू शकतात. या कारचे Vxi आणि Zxi प्रकार सीएनजीमध्ये दाखल होऊ शकतात. या कारमध्ये त्याच्या रेगुलर मॉडेल सारखेच फीचर्स असू शकतात.

टाटा पंच सीएनजी

टाटा मोटर्स लवकरच आपली पंच एसयुव्ही सीएनजी अवतारात लाँच करू शकते. ही गाडी ऑटो एक्सपो 2023 मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. या कारमध्ये अनेक आकर्षक वैशिष्ट्यांसह आरामदायी केबिन मिळू शकते. ही कार ड्युअल-सिलेंडर सीएनजी किटसह अनेक क्रिएटिव्ह ट्रिममध्ये सादर केली जाऊ शकते. या कारच्या सध्याच्या ICE व्हेरियंटची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत सहा लाख रुपये आहे.

टाटा अल्ट्रोझ सीएनजी

टाटा मोटर लवकरच आपली प्रीमियम हॅचबॅक कार टाटा अल्ट्रोझ सीएनजी प्रकारात लाँच करू शकते. या कारमध्ये ड्युअल-सिलेंडर किट उपलब्ध असू शकतो. या कारमध्ये 1.2L ड्युअल सिलेंडर इंजिन असू शकते. हे इंजिन 77bhp आणि 97Nm टार्क निर्माण करू शकेल. या गाडीच्या सीएनजी व्हर्जनमध्ये इंटिरियर आणि कॉस्मेटिकमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. ही कार बाजारामध्ये उत्कृष्ट फीचर्ससह लाँच होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या