Ajit Pawar | कसबा, चिंचवडच्या पोटनिवडणुकीबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य; “आमच्या पक्षाकडून…”

Ajit Pawar | पुणे : पुणे शहरातील कसबा (Kasba) आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची (Chinchwad bypoll election) पोटनिवडणुकीची सध्या चर्चा आहे. कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड मतदासंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही मतदारसंघामध्ये बिनविरोध निवडणूक व्हावी अशी भाजपची इच्छा आहे. याबाबत भाजपकडून वक्तव्ये देखील केली जात आहेत.

या पोटनिवडणुकीत इतर पक्षाने निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. यावरुनच ही निवडणूक बिनविरोध होईल यावर आता सर्व पक्षांकडून शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील अशी शंका व्यक्त केली आहे. ते पुण्यात (Pune) बोलत होते.

“सोमवार-मंगळवारी मुंबईत बसून महाविकास आघाडी चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा करणार आहे. दोन्ही शहरातील स्थानिक नेत्यांची आज भेट घेणार आहे. त्यांनी माझ्याकडे भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. भाजपकडून शंकर जगताप अथवा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचं नाव कळवले आहे. कसबा विधानसभासाठी भाजपची काही नावं पुढे येत आहेत. त्याचबरोबर दिवंगत मुक्ता टिळक यांचे पतीही इच्छुक आहेत. त्यांचा निर्णय भाजप घेतील आम्ही त्यात नाक खुपसणे गरजेचं नाही. मात्र दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवावी अशी इच्छा दोन्ही शहरातील आमच्या कार्यकर्त्यांची आहे, त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल का याबाबत मला शंका आहे”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

“महाविकास आघाडीमध्ये काही नवीन प्रश्न उभे राहतील, अशी वक्तव्य करणार नाही. सत्यजीत तांबे यांच्याबाबत नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात बोलले आहेत. जे घडलं ते पुढे घडू नये यासाठी खबरदारी घ्यायला हवी. ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद जास्त आहे, त्या पक्षाला इतर पक्षांनी मदत करावी”, असेही अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) लढणार आहे. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने एकमुखाने हा निर्णय घेतला आहे. आज शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यासमोर प्रस्ताव मांडणार आहे. ज्येष्ठ नेत्यांशी स्थानिक नेते चर्चा करणार आहे. जर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तर चिंचवड शहरातून नाना काटे (Nana Kate), भाऊसाहेब भोईर (Bhausahen Bhoir) या नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे राहुल कलाटे (rahul Kalate) यांच्या देखील नावाची चर्चा रंगली आहे.

कसबा मतदारसंघातून काँग्रेसच्या ही निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर आणि कमल व्यवहारे यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून रुपाली पाटील ठोंबरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपच्या वतीने गणेश बिडकर, बप्पू मानकर, धीरज घाटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, स्वरदा बापट यांच्यापैकी एकाचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपकडून मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील उमेदवार म्हणून त्यांचे सुपुत्र कुणाल टिळक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.