Share

Bhaskar Jadhav | “निवडणूक आयोग स्वायत्त, यावर आमचा विश्वास नाही”; शिवसेनेचा गंभीर आरोप

Bhaskar Jadhav | मुंबई : शिवसेनेचे (Shivsena)  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले. शिंदेनी 40 आमदारांसोबत बंड केल्यानंतर भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. तेव्हापासून हे सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा विरोधकांकडून केला जाऊ लागला आहे. हा वाद आधी न्यायालयात आणि आता निवडणूक आयोगासमोर पोहोचला आहे. दोन्ही गटाच्या युक्तीवादानंतर निवडणूक आयोगाने निकाल न देता 30 जानेवारीची पुढची तारीख दिली. त्यावरुन शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)  यांनी गंभीर आरोप केला आहे.

“निवडणूक आयोग (Election commission) स्वायत्त असल्यासारखे काम करत नाही. शिंदे गटाने जे म्हटलं, तसाच निर्णय घेतला गेला. त्यामुळे आयोगाच्या भूमिकेवर आम्हाला विश्वास नाही”, असा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.

“अंधेरी पूर्व मतदार संघाच्या निवडणुकीत शिंदे गटाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह, पक्षाचं हे नाव गोठवायला सांगितलं. निवडणूक आयोगानं ते ऐकलं सुद्धा. हे निवडणूक आयोगाचे काय चालले आहे? आयोगाची ही भूमिका त्यांच्या स्वायतत्तेला धरून नाही. स्वायतत्ता आहे, यावर विश्वास ठेवण्याइतपत निवडणूक आयोग स्वायत्त नाही, असं माझं मत आहे” असे म्हणत भास्कर जाधवांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे.

“भाजपचा सध्या एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. देशात छोटे पक्ष शिल्लक राहता कामा नये, अशी भाजपची रणनीती आहे. भाजपच्या डोक्यात सध्या सत्तेची नशा आहे”, अशी टीकाही भास्कर जाधव यांनी केली आहे.

दरम्यान, शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्हाबाबत संभ्रम कायम असून याबाबची महत्त्वाची सुनावणी निवडणूक आयोगासमोर अद्यापही सुरु असतानाच ठाकरे गटाच्या नेत्याने अशा प्रकारे अविश्वास दर्शवल्याने ही टीका गांभीर्याने घेतली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav | मुंबई : शिवसेनेचे (Shivsena)  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन …

पुढे वाचा

Maharashtra India Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now