Chandrashekhar Bawankule | “प्रकल्प बाहेर जात असताना काय करत होते?”; बावनकुळेंची आदित्य ठाकरेंवर टीका

Chandrashekhar Bawankule | मुंबई : शिंदे सरकारच्या निष्काळजीपणामुळे वेदांता फॉक्सकॉनसारखा दीड लाख रोजगार देणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. आता वेदांता कंपनीला गुजरातमध्ये गुंतवणूकदार मिळत नाहीत, असा दावा ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे.

त्यामुळे वेदांताला पुन्हा महाराष्ट्रात यायचे असेल तर शिंदे-फडणवीस सरकारने पुढाकार घेतला पाहिजे असे सांगत यासंदर्भात वेदांताच्या व्यवस्थापनाला पत्र लिहिणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हणले. आदित्य ठाकरे यांच्या या दाव्यामुळे वेदांता-फॉक्सकॉनचा जवळपास दीड लाख कोटींचा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात येणार का?, अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत खोचक सवालही केला आहे.

प्रकल्प बाहेर जात असताना काय करत होते?, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्याचबरोबर १८ महिने मुख्यमंत्री घरात बसून होते असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला.

काय आहे फॉक्सकॉन कंपनी?

अहमदाबादमध्ये १००० एकर जमिनीवर हा प्लाँट उभारला जाणार आहे. या प्रोजेक्टमधून जवळपास १ लाख रोजगारही उपलब्ध होतील. प्रस्ताविक सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग फॅब्रिकेशन युनिट २८ nm टेक्नोलॉजी नोड्सवर काम करेल. फॉक्सकॉन आणि वेदांत या दोन्ही कंपन्या मिळून इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात काम करत आहेत. फॉक्सकॉन ही तायवानची कंपनी आहे. परंतु आता फॉक्सकॉन मोठ्या प्रमाणात भारतात गुंतवणूक करत आहे, कारण तायवानचे चीनशी असलेले संबंध खराब झाल्यानंतर या कंपनीचं लक्ष भारतावर अधिक आहे.

फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला  का गेला?

सेमी कंडक्शन धोरण असलेलं गुजरात एकमेव राज्य असल्याने फॉक्सकॉनने प्रकल्पासाठी गुजरातची निवड केल्याचं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. गुजरात सरकारने सेमी कंडक्शन धोरण बनविलं, असं धोरण बनवणारं देशातलं एकमेव राज्य. या धोरणांअंतर्गत गुंतवणूक यावी म्हणून स्टेट इलेक्ट्रिक मिशन स्थापन केलं. या मिशन अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांना ज्या सुविधा द्यायच्या त्याची मान्यता अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतली. गुजरात सरकार गेल्या फेब्रुवारीपासून गुंतवणुकीसाठी तयार होतं. या पॉलिसीमुळे सेमी कंडक्टर बनविणाऱ्या कंपन्यांनी गुजरात सरकारशी संपर्क साधत हा प्रकल्प गुजरातमध्ये सुरु करण्याचा निर्णय घेतला.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.