Sanjay Raut | “आमचा पक्ष प्रमुख कोण असेल ते पक्ष ठरवेल” – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेतच दोन गट पडले. सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं आणि भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. तेव्हापासून हे सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा विरोधकांकडून केला जाऊ लागला.

हा वाद आधी न्यायालयात आणि आता निवडणूक आयोगासमोर पोहोचला आहे. यासंदर्भात शुक्रवारी झालेल्या सुनावणीमध्ये दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. मात्र, त्यावर निकाल न देता आयोगानं ३० जानेवारीची पुढची तारीख दिली. त्यामुळे २३ जानेवारीला पक्षाध्यक्षपदाची मुदत संपत असल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाध्यक्षपदाचं काय होणार?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आमचा पक्ष प्रमुख कोण असेल ते पक्ष ठरवेल, असं संजय राऊत म्हणालेत. उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख असतील असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, यावेळी बोलताना जम्मू मधून शिवसेना निवडणूक लढवणार असल्याचं देखील ते म्हणाले.

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भारत जोडो यात्रेतील सहभागाबद्दल भाजपने जोरदार टीका केली होती. यावर संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावलं आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने मी भारत जोडो यात्रेत सहभागी झालो होतो.” तसेच भाजप ने राहुल गांधी यांची प्रतिमा खराब केली असल्याचा आरोप त्यांनी केला. देशाचे नेत्तृत्व करण्यास राहुल गांधी सक्षम असल्याचं सांगत देशातील जनता त्यांना पंतप्रधान बनवेल असा विश्वास असल्याचं राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: