🕒 1 min read
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बळीराजाला कायमच बसतो आणि यंदाही याची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. खरीप हंगाम (Maharashtra Weather) अगदी तोंडावर आला असतानाच आता शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणारी एक मोठी बातमी समोर आलीये.
यंदाच्या मान्सूनवर एल निनोचं (El Nino) मोठं संकट असल्याचा धक्कादायक अंदाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची माहिती दिली.
Maharashtra Weather Update
हवामान खात्याच्या (Weather Department) अंदाजानुसार, राज्यात यंदा पावसाची सरासरी केवळ ८८ टक्के राहण्याची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या एल निनोचा सर्वाधिक फटका बसू शकतो, असा थेट इशाराच सरकारने दिलाय. त्यामुळे आता पेरणीचं नियोजन कसं करायचं, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय.
यंदाच्या पावसाचा पॅटर्न उतरत्या क्रमाने असणार आहे. म्हणजेच, जून महिन्यात चांगला पाऊस होईल, पण जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचं प्रमाण हळूहळू घटत जाईल. सर्वात चिंतेची बाब म्हणजे पावसाच्या दोन दिवसांत मोठं अंतर असणार आहे. यामुळे पिकांवर मोठा ताण येऊ शकतो.
या संकटाचा सामना करण्यासाठी राज्यभर ‘जलयुक्त शिवार’ची कामे युद्धपातळीवर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. याआधी २०१५ साली एल निनोमुळे राज्याची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. त्यावेळी मराठवाड्यात तब्बल ३९ टक्के पावसाची तूट (फक्त ६१ टक्के पाऊस) नोंदवली गेली होती.
तशी दुष्काळी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास काय करायचं, यासाठी प्रत्येक जिल्ह्याला आतापासूनच ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्याच्या कडक सूचना सरकारने दिल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मलायका अरोरा पुन्हा बोहल्यावर? 19 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडसोबत थेट आईच्या घरी; चर्चांना उधाण
- हेमंत ढोमेचा ‘कॉकरोच जनता पार्टी’ला जाहीर पाठिंबा; ‘त्या’ सडेतोड पोस्टने राजकीय वर्तुळात उडवली खळबळ!
- करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशच्या गुपचूप लग्नाची चर्चा; आता प्रपोजलचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर अन् चाहत्यांना सुखद धक्का!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












