Share

​’लोकराज्य’मध्ये बाबासाहेबांचा अपमान; डॉ. नितीन राऊत आक्रमक, मुख्यमंत्र्यांकडून २४ तासांत कारवाईचे आश्वासन

‘लोकराज्य’ मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र चुकीच्या पद्धतीने छापल्याच्या प्रकरणावर डॉ. नितीन राऊत यांनी विधिमंडळात सरकारला धारेवर धरत कठोर कारवाईची मागणी केली.

Published On: 

Dr. Nitin Raut

मुंबई : महाराष्ट्र शासनाचे अधिकृत मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या (Lokrajya Magzine) एप्रिल २०२६ च्या अंकात, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे छायाचित्र अत्यंत बेजबाबदारपणे ‘उलटे’ छापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर विषयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut ) यांनी आज विधिमंडळात स्थगन प्रस्तावाद्वारे सरकारला धारेवर धरले. या अक्षम्य चुकीचा निषेध करत, हा प्रकार म्हणजे केवळ तांत्रिक चूक नसून महामानवांच्या अस्मितेशी खेळ असल्याचा आरोप त्यांनी केला.

​‘लोकराज्य’ की अधिकाऱ्यांचे ‘बेफिकीर राज्य’?

सभागृहात स्थगन प्रस्तावावर बोलताना डॉ. नितीन राऊत यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. डॉ. राऊत म्हणाले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे हे मासिक केवळ पुस्तक नसून महाराष्ट्राचा शासकीय दस्तावेज आहे. या मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र उलटे छापल्यामुळे ते डावखुरे असल्याचा चुकीचा आणि खोडसाळ संदेश जनमानसात जात आहे. एवढेच नव्हे, तर त्यांच्या पार्श्वभूमीवर असलेला ‘भारतरत्न’चा लोगोसुद्धा उलटा छापला आहे. हा Emblems and Names Act, 1950 आणि Prevention of Insults to National Honour Act, 1971 या केंद्रीय कायद्यांचा थेट भंग असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ५-५ टप्प्यांवर प्रूफ-चेकिंग होत असताना कोणाच्याही हे लक्षात कसे आले नाही, असा सवाल करत, हे सरकार महामानवांच्या अस्मितेबाबत किती बेफिकीर झाले आहे, हे यातून स्पष्ट होत असल्याचे डॉ. राऊत म्हणाले.

या घोर चुकीबद्दल मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची या सभागृहात तात्काळ बिनशर्त माफी मागून बाजारातील सर्व छापील अंक जप्त करून नष्ट करावेत आणि ऑनलाईन माध्यमांतून पीडीएफ आवृत्ती त्वरित हटवावी तसेच संबंधित संपादक, माहिती अधिकारी आणि जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ७ दिवसांत चौकशी पूर्ण करून अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात यावा. या मागण्या डॉ. राऊत यांनी सभागृहात लावून धरल्या.

मुख्यमंत्र्यांची दखल; २४ तासांत कारवाईची ग्वाही

डॉ. नितीन राऊत यांनी उपस्थित केलेल्या या गंभीर विषयाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केले की, ही घटना अतिशय गंभीर असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ‘लोकराज्य’ मासिकात चुकीच्या पद्धतीने (रिव्हर्स) छापला गेला आहे, हे सत्य आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि येत्या २४ तासांच्या आत यासंदर्भात कायदेशीर व प्रशासकीय कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

​डॉ. नितीन राऊत यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारला या प्रकरणावर तातडीने पावले उचलावी लागली आहेत. आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई होते आणि दोषींवर काय धाडसी पावले उचलली जातात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही