Ajit Pawar | सांगली : विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे सुपुत्र राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार (Parth Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी (१९ जाने) राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेतली. पार्थ पवार यांनी अचानक शंभुराज देसाई यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या. पार्थ पवार आणि शंभुराज देसाई यांच्या भेटीवरुन पार्थ पवार हे राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. दरम्यान, या भेटीवर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
राजकीय विरोधक म्हणजे कुणी दुष्मन नव्हे. एकमेकावर राजकीय टीकात्मक बोलले तरी विकास कामाबाबत चर्चा, संवाद होतच असतो, असे सांगत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पार्थ पवार (Parth Pawar) आणि शंभूराज देसाई (Shamburaj Desai) यांच्या भेटीचे अप्रत्यक्ष समर्थन केलं आहे.
ते म्हणाले, “मी मंत्री असताना अनेक राजकीय नेते भेटत होते. अशा अनौपचारिक बैठकीमध्ये विकास कामाबाबत चर्चाही केली जाते. सत्ताधारी आणि विरोधक म्हणजे काही शत्रू नाही, हे समजून घ्यावे.”
“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार एकमेकाबद्दल टीकात्मक भाषण करायचे, पण एकत्र भेटल्यावर मैत्रीपूर्ण बोलायचे आणि हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे”, असंही अजित पवार (Ajit Pawar) यावेळी बोलताना म्हणाले.
पार्थ पवार राष्ट्रवादीत नाराज?
2019 मध्ये मावळमधून पार्थ पवार यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली. त्यांच्या उमेदवारीवर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. पार्थ पवार मावळमधून उभे राहिल्यानं शरद पवारांनी माढामधून माघार घेतली. त्या निवडणुकीत पार्थ पवारांचा 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला. याउलट शरद पवारांच्या सांगण्यावरून रोहित पवारांनी जामखेडमधून विधानसभा निवडणूक लढवली. ते आमदार झाले आणि आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही झालेत. पार्थऐवजी रोहित पवारांना आजोबा झुकतं माप देत असल्याचं बोललं जातं.
महत्वाच्या बातम्या :
- Nilesh Rane | “राऊत दिसतोय की नाही एक नंबर चुxxx”; निलेश राणेंची जीभ घसरली
- Shivsena | ‘या’ दिवशी ठरणार ‘धनुष्यबाण’ कोणाचा?; आता द्यावं लागणार लेखी उत्तर!
- Shivsena | शिवसेना कोणाची संभ्रम कायम; उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचं काय?
- Shivsena | ३० जानेवारीला ठरणार शिंदे गटाचे अस्थित्व; निवडणूक आयोगाकडून ‘तारीख पे तारीख’
- Ajit Pawar | “सरकारला सत्तेची मस्ती आली आहे”; अजित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका