Nilesh Rane | मुंबई : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत काल (२० जाने) जम्मू येथे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. भर पावसात संजय राऊत यांनी राहुल गांधींसोबत 12 किलोमीटरचा टप्पा पार केला. यावरून रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे (Nilesh Rane) यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून राहुल गांधी आणि संजय राऊत यांचा भारत जोडो यात्रेदरम्यानचा फोटो शेअर करण्यात आला आहे. हाच फोटो ट्विट करत निलेश राणे (Nilesh Rane) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे.
यावेळी त्यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत खालच्या पातळीची टीका केली आहे. “संज्या दिसतोय की नाही एक नंबर चा चुxxx”, अशा कॅप्शनसह निलेश राणेंनी हे ट्विट केलं आहे.
संज्या दिसतोय की नाही एक नंबर चा चुतीया. pic.twitter.com/aZNBFehgnC
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 20, 2023
दरम्यान, संजय राऊत यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, पदयात्रेच्यावेळी पावसाला सुरुवात झाली. तेव्हा राहुल गांधी यांनी माझ्यासाठी रेनकोटची व्यवस्था केली. ते सुरुवातीला मला त्यांच्यात अंगातील रेनकोट काढून देत होते. मी नको नको म्हणत असतान त्यांनी गाडीतून दुसरा रेनकोटही मागवला. मात्र, मी पावसात चालायची तयारी दाखवली आणि आम्ही पुढे चालू लागलो. महाराष्ट्रातही पावसामुळेच सत्तांतर झाले होते, असे संजय राऊत यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena | ‘या’ दिवशी ठरणार ‘धनुष्यबाण’ कोणाचा?; आता द्यावं लागणार लेखी उत्तर!
- Shivsena | शिवसेना कोणाची संभ्रम कायम; उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचं काय?
- Shivsena | ३० जानेवारीला ठरणार शिंदे गटाचे अस्थित्व; निवडणूक आयोगाकडून ‘तारीख पे तारीख’
- Ajit Pawar | “सरकारला सत्तेची मस्ती आली आहे”; अजित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका
- EKNATH SHINDE | ‘शिंदे गट राजकीय पक्षच नाही’; ठाकरे गटाचा दाव्याने एकनाथ शिंदेंना मोठा धक्का