EKNATH SHINDE | ‘शिंदे गट राजकीय पक्षच नाही’; ठाकरे गटाचा दाव्याने एकनाथ शिंदेंना मोठा धक्का

EKNATH SHINDE | Shivsena | नवी दिल्ली : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर आपला दावा सांगण्यात येत आहे. शिवसेनेकडून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण आमचे आहे असा दावा ठाकरे आणि शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने 17 जानेवारी रोजी दोन्ही गटाकडून युक्तीवाद ऐकून घेतला आणि निर्णय आज 20 जानेवारी रोजी देणार असल्याचे जाहीर केले होते.

“शिवसेनेच्या (Shiv Sena) ठाकरे गटाकडून (Thackeray Group) केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात आलेली नाही. शिंदे गटाकडून (Shinde Group) तसं काहीही झालेलं नाही. त्यामुळे शिंदे गट हा राजकीय पक्षच नाही”, असा जोरदार युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल ( Kapil Sibbal ) यांनी केला आहे.

“दरवर्षी पाच वर्षात निवडणूक आयोगात सर्व पक्षाची प्रक्रिया सादर करावी लागते. त्याच पद्धतीची प्रक्रिया ठाकरे गटाकडून होते. त्यामुळे शिवसेना हा राजकीय पक्ष नाही. ज्यावेळेस पक्षाच्या बैठका बोलावलेल्या होत्या त्यावेळेस शिंदे गटाचे सर्व आमदार गुवाहाटीला निघून गेले. पक्षाने बोलावलेल्या बैठकीत या आमदारांनी येणं अपेक्षित होतं. लोकशाही पद्धतीने त्यांनी आपलं मत मांडता आलं असतं. त्यांनी म्हणणं न मांडता पक्ष सोडला”, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Back to top button