Shubhangi Patil | शुभांगी पाटील आशीर्वाद घेण्यासाठी बाळासाहेबांच्या घरी, गेटवरूनच पाठवलं परत

Shubhangi Patil | अहमदनगर : राज्यात सध्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. नाशिकमधील महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा सुरू होती. या सर्व चर्चेचा खुलासा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतिने बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर नाशिकमधून शुभांगी पाटील (Shubhangi Patil) या अधिकृत उमेदवार असल्याचे महाविकास आघाडीने जाहीर केले आहे.

शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात नक्की येणार असून ते रुग्णालयात आहेत. लवकरच ते बाहेर येतील, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर नाशिक पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील आज संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांना भेटण्यासाठी आल्या होत्या.

shubhangi patil 1

मात्र, थोरात कुटुंबीय सध्या मुंबईत असल्याने त्यांना प्रवेशद्वारातूनच परत जावे लागले. बंगल्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना घरी कोणीच नसल्याचे सांगितले. त्यानंतर शुभांगी पाटील गेटवरूनच परत गेल्या. यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बंगल्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना ओळखले नसेल आणि थोरात कुटुंबीय मुंबईत असल्याने पाटील यांना तसे सांगून परत पाठविले, असेल असे थोरात यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाटील यांना थोरात यांच्या घरी प्रवेश नाकारल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे थोरात सध्या मुंबईत उपचार घेत असल्याचे माहिती असूनही पाटील त्यांच्या संगमनेरमधील घरी कशा आल्या?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

Back to top button