Skin Care Tips | चेहऱ्याला कोरफड आणि गुलाब जल लावल्याने मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी कोरफड (Aloevera) खूप फायदेशीर मानली जाते. कारण कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म उपलब्ध असतात. कोरफड नियमित चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स, डाग, सुरकुत्या इत्यादी समस्या दूर होऊ शकतात. कोरफडीप्रमाणेच गुलाब जल (Rose Water) देखील आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. गुलाबजलामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म त्वचेला मुलायम आणि चमकदार बनवू शकतात. अशात त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोरफड आणि गुलाब जल एकत्र करून चेहऱ्याला लावू शकतात. होय! चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही गुलाब जल आणि कोरफडीचा फेसपॅक बनवून चेहऱ्याला लावू शकतात.

हा फेसपॅक तयार करण्यासाठी तुम्हाला एक चमचा कोरफडीमध्ये एक चमचा गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यावर दहा ते पंधरा मिनिटे तुम्हाला ते चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. हे मिश्रण सुकल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागले. तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा या मिश्रणाचा वापर करू शकतात. या मिश्रणाचा वापर केल्याने चेहऱ्यावरील पुढील समस्या दूर होऊ शकतात.

डागांची समस्या दूर होते

कोरफड आणि गुलाब जलचा फेसपॅक त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करू शकतो. त्वचेवरील काळे डाग काढण्यासाठी हे मिश्रण खूप फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर नियमित या फेसपॅकचा वापर केल्याने त्वचेचा रंग सुधारू शकतो.

डार्क सर्कल्स दूर होतात

डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळे तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य कमी करू शकतात. त्यामुळे चेहऱ्यावर आलेली काळी वर्तुळे घालवण्यासाठी तुम्ही कोरफड आणि गुलाब जल वापरू शकतात. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही कोरफड आणि गुलाब जलचा फेसपॅक डोळ्यांनी खाली आलेल्या वर्तुळांवर लावू शकतात. नियमित या फेसपॅकच्या उपयोगाने डोळ्यांखालील काळ्या वर्तुळाची समस्या दूर होऊ शकते.

त्वचा मॉइश्चरायझ होते

कोरफड आणि गुलाब जल यांचे मिश्रण नियमित चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील कोरडेपणाची समस्या दूर होऊ शकते. कारण या दोन्ही घटकांमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे नियमित हा फेसपॅक लावल्याने चेहरा मुलायम आणि चमकदार होऊ शकतो.

चेहऱ्याचा रंग सुधारतो

कोरफड आणि गुलाबजलचे मिश्रण त्वचेला खोलवर स्वच्छ करते. त्याचबरोबर या मिश्रणाच्या वापराने त्वचेवरील डेड स्कीन साफ होण्यास मदत होते. परिणामी त्वचेवरील काळवटपणा दूर होऊन त्वचा रंग सुधारू शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.