Travel Tips | भारतीय कला आणि संस्कृती बघायची असेल, तर फेब्रुवारी महिन्यात ‘या’ ठिकाणांना द्या भेट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Travel Tips | टीम महाराष्ट्र देशा: फेब्रुवारी महिन्यातील वातावरण फिरण्यासाठी अनुकूल असते. या महिन्यामध्ये देशात अनेक ठिकाणी सांस्कृतिक मेळावे आयोजित केले जातात. या सांस्कृतिक मेळाव्यामध्ये देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भाग घेतात. या कार्यक्रमांमध्ये भारतीय कला आणि संस्कृतीची ओळख करून दिली जाते. तुम्ही फेब्रुवारी महिन्यात कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही या सांस्कृतिक कार्यक्रमांना भेट देऊ शकतात. फेब्रुवारी महिन्यात पुढील ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

मरू महोत्सव, जैसलमेर

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात राजस्थानमधील जैसलमेर येथे मुरू महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी 3 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये देश-विदेशातील लोक सहभागी होतात. यामध्ये राजस्थानच्या कला आणि संस्कृतीची ओळख करून दिली जाते. त्यामुळे तुम्ही फेब्रुवारी महिन्यात कुठे फिरायला जाण्याचे नियोजन करत असाल, तर जैसलमेर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.

कार्निव्हल, गोवा

तुम्हाला जर कोकणी कला आणि संस्कृतीची ओळख करून घ्यायची असेल, तर तुम्ही फेब्रुवारी महिन्यात गोव्याला भेट देऊ शकतात. कारण या महिन्यामध्ये गोव्यात कार्निव्हलचे आयोजन केले जाते. गोवा कार्निव्हल फेस्टिवल दरवर्षी 18 ते 21 फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जातो.

काळा घोडा महोत्सव, मुंबई

महाराष्ट्रामध्ये स्थित असलेले मुंबई शहर हे बॉलीवूडमुळे प्रसिद्ध आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात मुंबईमध्ये काळा घोडा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवामध्ये मराठी सभ्यता, संस्कृती आणि कलेची ओळख करून देण्यात येते. त्यामुळे तुम्ही फेब्रुवारी महिन्यात कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर काळा घोडा उत्सवाला भेट देऊ शकतात.

इंडियन आर्ट फेअर, दिल्ली

देशाची राजधानी दिल्ली येथे इंडियन आर्ट फेअरचे आयोजन केले जाते. दरवर्षी वसंत ऋतूमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी 09 ते 12 फेब्रुवारी दरम्यान हा उत्सव पार पडणार आहे. या उत्सवामध्ये तुम्हाला भारतीय संस्कृती आणि सभ्यतेची ओळख करून दिली जाते.

महत्वाच्या बातम्या