Shivsena | धनुष्यबाण कोणाचा?; आज पुन्हा निवडणूक आयोगासमोर शिंदे-ठाकरे येणार आमने सामने

Shivsena | नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिवसेना (Shivsena) पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? यावर मंगळवारी 17 जानेवारी रोजी सुनावणी पार पडली. पण 17 जानेवारी रोजी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibbal) आणि शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांनी आपला युक्तीवादानंतर निवडणूक आयोगाने सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आज 20 जानेवारी रोजी ही सुनावणी पुन्हा एकदा सुरु होणार आहे.

17 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत निवडणूक आयोगाने दोन्ही गटाचा युक्तीवाद ऐकून घेतला. ‘उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. शिवसेनेत फूट पडलेलीच नाही. जी फूट पडल्याचे भासवले जात आहे कपोलकल्पित आहे’, असा दावा कपिल सिब्बल यांनी यावेळी केला. ‘शिवसेनेत ही फूट ग्राह्य धरू नये आणि सर्वोच न्यायालयाचा निर्णय येईल पर्यंत कोणतही निर्णय घेऊ नये’, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे.

त्याचबरोबर, ‘आमच्याकडे आमदार आणि खासदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. सर्वोच्च न्यायालयात अद्याप कोणाचेही निलंबन झालेले नाही, त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा’, अशी मागणी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केली आहे.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके ठाकरे गटाचे की शिंदे गटाचे या निर्णयावर आज तरी शिक्कामोर्तब होणार की नाही? हे पाहणं आता शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटासह अवघ्या महाराष्ट्राला पडला आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button