PM Kisan Yojana | ‘या’ कारणामुळे पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याला होत आहे उशीर

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: सरकारच्या पीएम किसान योजनेतील 12 वा हप्ता शेतकऱ्यांपर्यंत कधीच पोहोचला आहे. शेतकरी सध्या या योजनेतील 13 व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. या योजनेतील 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचायला उशीर झाला आहे. कारण गेल्या वर्षी जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेतील हप्ता पोहोचला होता. यावर्षी देखील अशीच अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, यावर्षी अजूनपर्यंत या हप्त्याचा पत्ता नाही.

पीएम किसान योजनेतील 12 वा हप्ता शेतकऱ्यांपर्यंत सुमारे दीड महिना उशिरा पोहोचला होता. आता तेराव्या हप्त्याचीही अशीच अवस्था झाली आहे. तेरावा हप्ता जारी न करण्यामागील कारण अपात्र उमेदवारांची पडताळणी आहे. कारण या योजनेतील बारावा हप्ता मिळवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी बनावटी कागदपत्रांची मदत घेतली होती. अशा परिस्थितीत योग्य ती पडताळणी करूनच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात येणार आहे. कारण शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने ही योजना सुरू करण्यात आली होती.

केंद्र सरकार हा हप्ता जारी करण्यासाठी 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांची पडताळणी करत आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदीची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे. ज्या शेतकऱ्यांच्या या सर्व गोष्टी पूर्ण असतील त्यांचाच या योजनेच्या यादीत समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे हे काम राहिले आहे त्यांनी ती तातडीने पूर्ण करून घ्या, असं सरकारकडून सातत्याने सांगितलं जातं आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात पीएम किसान योजनेचा अकरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचला होता. यामध्ये 10.45 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 22,552 कोटी रुपये पाठवण्यात आले होते. तर, या योजनेतील बारावा हप्ता 17 ऑक्टोबर 2022  रोजी जारी करण्यात आला होता. बाराव्या हप्त्यामध्ये 8.42 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.