Weather Update | राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण, तर देशात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशात उत्तर भारतामध्ये हवामानात सातत्याने बदल होत आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशात चांगलीच थंडी वाढली होती. अशात देशातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यामध्ये देखील काही भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

21 जानेवारीपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 22 जानेवारीनंतर हवामानात बदल होईल. सध्या सक्रिय असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 23 ते 25 जानेवारी दरम्यान राज्यात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर, महाराष्ट्रातील किनारपट्टी भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून रिमझिम पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

उत्तराखंडमध्ये पुढील 48 तासात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बदलत्या वातावरणामुळे या ठिकाणी तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.

या थंड वातावरणात अचानक येणाऱ्या पावसामुळे नागरिकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सर्दी, खोकला, थंडी-ताप अशा समस्या निर्माण होण्याची भीती आरोग्य विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही सरकारकडून करण्यात आले आहे. कोरोनाची भीती पुन्हा निर्माण झाल्याने आरोग्य विभाग सर्व बाबतीत सतर्क आहे.

महत्वाच्या बातम्या

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.