Narendra Modi | “मधल्या काळात डबल इंजिन सरकार नव्हतं म्हणून मुंबई, महाराष्ट्राचं नुकसान”- नरेंद्र मोदी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Narendra Modi | मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याहस्ते आज विविध विकास कामांचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी अखेर आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या (BMC Election 2023) प्रचाराचं रणशिंग फुंकले आहे. मुंबईत विकास कामांबाबत बोलताना पंतप्रधान मोदींनी  महाविकास आघाडीवर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे.

“मधल्या काळात डबल इंजिन सरकार नव्हतं त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राचे नुकसान झाले. कारण त्या सरकारच्या काळात विविध योजना आणि प्रकल्प यांच्यात अडथळे निर्माण करण्याचे काम झाले. आता मात्र विकासाला पुन्हा गती आली आहे. कारण शिंदे फडणवीसांचे डबल इंजिन सरकार महाराष्ट्राल मिळाले आहे आता हा विकासाला गती मिळाली आहे” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणाले आहेत.

“मुंबईकरांच्या प्रत्येक समस्येला मी समजू शकतो. भाजपचे सरकार असो किंवा एनडीएचे सरकार असो आम्ही विकासाच्या पुढे राजकार कधीही आणत नाही. राजकीय स्वार्थासाठी विकासात अडथळे आणत नाही”, असा टोलाही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांना लगावला आहे.

“मुंबईला भविष्यातल्या विकासासाठी तयार करणं ही डबल इंजिन सरकारची जबाबदारी आहे. 2014 पर्यंत मुंबईत 10-11 किमी मेट्रो चालत होती. मात्र जेव्हा डबल इंजिन सरकार आलं तेव्हा या कामाला गती मिळाली. मधल्या काळात थोडा ब्रेक लागला होता. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर या कामांना पुन्हा गती मिळाली आहे”, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहे.

“स्वराज्य आणि सुराज्य हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे तोच विचार  आम्हीही पुढे घेऊन चाललो आहोत. या देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास आम्ही करतो आहोत. मुंबईच्या विकासाशी संबंधित 40 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि शिलान्यास करण्यात आला आहे. मुंबईकरांसाठी अत्यावश्यक असलेली मेट्रो असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसाचे नुतनीकरण असो, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असो या सगळ्या योजना मुंबईच्या विकासात भर घालणाऱ्या आहेत”, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

दरम्यान, “आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच भारत देश मोठी स्वप्ने पाहू शकतो आहे ती स्वप्ने पूर्ण करण्याचे साहस करू शकतो. आपला एक मोठा कालखंड गरिबीची चर्चा करण्यात आणि जगातल्या देशांकडून मदत मागण्यात गेला. मात्र आता जगाला भारताच्या विविध संकल्पांवर विश्वास बसू लागला आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे झाल्यानंतर आधुनिक भारत ही संकल्पना पुढे आली आहे. भारताबाबत जगभरात सकारात्मकता आहे. कारण सगळ्या जगाला हे समजलं आहे की भारत देश आपल्याकडे असलेल्या सामर्थ्याचा सदुपयोग करतो आहे”, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :