Narendra Modi | “मुंबई महापालिकेवर भाजपला सत्ता द्या”; पंतप्रधान मोदींचे आवाहन

Narendra Modi | मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याहस्ते आज विविध विकास कामांचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी अखेर आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या (BMC Election 2023) प्रचाराचं रणशिंग फुंकले आहे. “मुंबईत विकास कामे जलद गतीने करण्यासाठी भाजप (BJP) आणि एनडीएच्या (NDA) सरकारला पाठिंबा द्या. मुंबई महापालिकेवर भाजपला सत्ता द्या”, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र … Read more

Published On: 

Narendra Modi | मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याहस्ते आज विविध विकास कामांचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी अखेर आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या (BMC Election 2023) प्रचाराचं रणशिंग फुंकले आहे. “मुंबईत विकास कामे जलद गतीने करण्यासाठी भाजप (BJP) आणि एनडीएच्या (NDA) सरकारला पाठिंबा द्या. मुंबई महापालिकेवर भाजपला सत्ता द्या”, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

“मुंबईत 2014 पासून विकासकामांना गती मिळाली. पण मधल्या काळात म्हणजेच महाविकास आघाडीच्या काळात विकासाचा वेग मंदावला होता. पण आता शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात पुन्हा विकासाला वेग आला आहे”, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

आगामी वर्षात मुंबईचा कायापालट होईल. प्रत्येकासाठी मुंबईत राहणे सुविधेचे होईल. याशिवाय आजूबाजूच्या जिल्ह्यांवरुन मुंबईत येणं-जाणं सुलभ होईल. कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ, धारावी पुनर्विकास, जुन्या चाळींचा विकास सगळ्या गोष्टी आता ट्रॅकवर येत आहेत. मी त्यासाठी शिंदे-फडणवीस यांना अभिनंदन करतोय”, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही