Bharat Gogawale । “माणसाने संसाराला सुरूवात केल्याशिवाय तो…”; भरत गोगावलेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

 Bharat Gogawale । मुंबई : मुंबई महापालिकेकडून ४०० किलोमीटरच्या रस्त्यांमध्ये ६ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. रस्ते घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केलीय. या पार्श्वभूमीवर भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देत खोचक टोलाही लगावला आहे.

“मुंबईत आम्ही चांगले रस्ते तयार करायला घेतले आहेत. तसंच मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. आदित्य ठाकरेंना हे समजायला पाहिजे होतं की आपण काय करू शकलो नाही. स्त्यांची कामंही सुरू झालेली नाहीत आणि त्यांना भ्रष्टाचार कसा दिसला?”, असा सवाल भारत गोगावले यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, “कामला सुरूवात झाल्यावर बिलं होतील त्यानंतर आरोप केला तर ठीक आहे. आदित्य ठाकरेंना कुठून स्वप्न पडलं माहित नाही. मला तर वाटतं यांना स्वप्न असं पडलं आहे की मुंबईची महापालिका ही आपल्या हातून गेली आहे. काळ्या दगडावरची ही रेष आहे.” आपण काही करू शकलो नाही मग आता समोरच्याच्या चुका काहीतरी दाखवायला पाहिजेत म्हणून हे आरोप केले जात असल्याचं गोगावले यावेळी बोलताना म्हणाले.

आदित्य ठाकरेंनी आधी दुसऱ्यावर टीका करण्याआधी आणि शिंतोडे उडवण्याआधी आपण काय केलं हे बघावं. माणसाने संसाराला सुरूवात केल्याशिवय तो परिपक्व होत नाही असं म्हटलं जातं. आदित्य ठाकरेंना अजून त्यासाठी वेळ आहे, असाही चिमटा भरत गोगावले यांनी काढलाय.

महत्वाच्या बातम्या :