Supriya Sule | “आमच्या घरच्यांविषयी बोलल्याशिवाय…”; सुप्रिया सुळेंचा पडळकरांवर पलटवार 

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Supriya Sule | पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे सुपुत्र राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार (Parth Pawar) यांनी आज राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेतली. पार्थ पवार यांनी अचानक शंभुराज देसाई यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. पार्थ पवार आणि शंभुराज देसाई यांच्या भेटीवरुन पार्थ पवार हे राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याच्या चर्चेला जोर आला आहे.

अशातच पार्थ पवार अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी शंभूराजे देसाई यांची भेट घेतली असावी, असं वक्तव्य भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी चांगलंच सुनावलं आहे.

“आमच्या घरच्यांविषयी बोलल्याशिवाय बातमी होतच नाही. तुम्हाला माझा उद्धटपणा वाटेल, पण तुम्हाला हात जोडून म्हणते की, तो माझा उद्धटपणा नाही”, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत.

पुढे त्या म्हणाल्या, “मी प्रांजळपणे सांगते. आमच्या घरातील कोणाचा तरी कोणा सोबत फोटो होत असेल आणि त्याची बातमी होत असेल तर हाऊ द्या. चॅनेल पण बिझी राहतील आणि त्यांना पण पब्लिसिटी मिळते. एवढं तरी माणसानं दिलदार असलं पाहिजे.” दरम्यान, पार्थ पवार यांनी आज शंभुराज देसाई यांची त्यांच्या बंगल्यावर भेट घेतली. यावेळी विकासकामांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. या भेटीबाबत पार्थ पवार यांनी काहीही भाष्य केले नाही.

गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य काय?

“पार्थ पवार अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी शंभूराजे देसाई यांची भेट घेतली असावी. रोहित पवार आमदार झाले. बारामती अॅग्रो त्यांच्याकडे आहे. मुंबई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही झाले. आजोबांकडून अन्याय होत असल्याची भावना पार्थची असेल. हक्काच्या मतदारसंघात अडीच लाखाहून अधिक मतांनी पराभूत झालाचे शल्य त्यांच्या मनात आहे. त्यामुळेच ही भेट झाली असावी”, असे गोपिचंद पडळकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :