Share

Travel Guide | वीकेंडला फिरायला जाण्याचा प्लान करत असाल, तर ‘ही’ ठिकाणं ठरू शकतात उत्तम पर्याय

🕒 1 min read Travel Guide | टीम महाराष्ट्र देशा: विकेंड जवळ येताच प्रत्येकाला फिरायला जाण्याची चाहूल लागत असते. अनेकजण गुरुवार-शुक्रवारपासूनच वीकेंडची तयारी करायला सुरुवात करतात. तुम्ही पण विकेंडला कुठेतरी फिरायला जाण्याची तयारी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विकेंडला फिरायला जाण्यासाठी काही शांत आणि सुंदर ठिकाणांबद्दल माहिती … Read more

Published On: 

🕒 1 min read

Travel Guide | टीम महाराष्ट्र देशा: विकेंड जवळ येताच प्रत्येकाला फिरायला जाण्याची चाहूल लागत असते. अनेकजण गुरुवार-शुक्रवारपासूनच वीकेंडची तयारी करायला सुरुवात करतात. तुम्ही पण विकेंडला कुठेतरी फिरायला जाण्याची तयारी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विकेंडला फिरायला जाण्यासाठी काही शांत आणि सुंदर ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत. या विकेंडला तुम्ही पुढील ठिकाणी फिरायला जाऊ शकतात.

इगतपुरी

इगतपुरी हे ठिकाण विकेंड गेटवेसाठी एक उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणाची खासियत म्हणजे हे शहर मुंबई, पुणे आणि नाशिक शहरापासून जवळ आहे. त्यामुळे तुम्ही विकेंडला इगतपुरीला जाण्याचा प्लॅन करू शकतात. इगतपुरी हे शहर मुंबईपासून 120 किलोमीटर अंतरावर आहे. इगतपुरीला जाताना पश्चिम घाटामधून जावे लागते. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी निसर्गाचे सर्वोत्तम दृश्य बघायला मिळू शकतात. तुम्हाला जर तुमचा वीकेंड शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी घालवायचा असेल, तर तुम्ही इगतपुरीला जाण्याची ट्रीप प्लॅन करू शकतात.

अलिबाग

रायगड जिल्ह्यामध्ये वसलेले अलिबाग हे एक सुंदर शहर आहे. हे शहर मुंबईपासून खूप जवळ आहे. अलिबागमध्ये तुम्ही शिवाजी स्मारक, बीच, कोलाबा किल्ला इत्यादी प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ शकतात. फोटोशूटसाठी देखील अलीबाग एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला तुमचा वीकेंड समुद्रकिनारी घालवायचा असेल, तर तुम्ही अलिबागला नक्कीच भेट देऊ शकतात.

कामशेत

मुंबई-पुण्याच्या जवळ स्थित असलेले कामशेत हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. कामशेतला भेट देण्यासाठी जानेवारी हा सर्वोत्तम महिना आहे. या ठिकाणी तुम्ही पवना तलाव, शिंदेवाडी टेकड्या, भैरी आणि बेडसा लेणींना भेट देऊ शकतात. कामशेतमध्ये तुम्हाला निसर्गाचे उत्कृष्ट नजारे दिसतील. त्याचबरोबर कामशेतमध्ये तुम्हाला पॅराग्लायडिंगचा देखील आनंद घेता येऊ शकतो.

कर्जत

कर्जत हे शहर मुंबई आणि पुण्यापासून अगदी जवळ आहे. विकेंडला फिरायला जाण्यासाठी कर्जत हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. या ठिकाणी तुम्ही निवांत निसर्गाच्या सानिध्यात तुमची सुट्टी घालवू शकतात. कर्जतमध्ये तुम्हाला निसर्गाचे अनेक नयनरम्य दृश्य बघायला मिळतील.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Travel

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या