Shah Rukh Khan | मुंबई: बॉलीवूड किंग खान म्हणजे शाहरुख खान (Shah Rukh Khan) तब्बल चार वर्षानंतर रुपेरी पडद्यावर ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटाच्या माध्यमातून पुनरागमन करणार आहे. किंग खानचा हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट 25 जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट टिझर रिलीज झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ या गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या गाण्यामध्ये दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीवर अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता.
‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ या गाण्यामुळे सुरू झालेल्या वादावर चित्रपटातील कोणत्याही कलाकाराने आपली प्रतिक्रिया दिली नव्हती. अशा परिस्थितीत चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी चित्रपटातील मुख्य अभिनेता शाहरुख खान याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘पठाण’ चित्रपट निर्मित केलेल्या ‘यशराज फिल्म’ने सोशल मीडयावर शाहरुख खानच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुखने आपले मत व्यक्त केलं आहे.
या मुलाखतीमध्ये किंग खान दीपिका पदुकोणच्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाला, “दीपिका पदुकोण एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. ॲक्शन सीन्स करताना दीपिकाने मला चांगलीच टक्कर दिली आहे. या चित्रपटामध्ये दीपिका ‘बेशर्म रंग’ गाण्यात नृत्य करताना दिसत आहे. तर चित्रपटातील काही सीनमध्ये ती ॲक्शन मोडमध्ये आहे. ‘बेशर्म रंग’ या गाण्याला दीपिकासारखी अभिनेत्री उत्कृष्ट पद्धतीने सादर करू शकते, असं मला वाटतं.”
King Khan’s 32-year-old dream comes true as he turns an action hero in Pathaan! Watch all the revelations of @iamsrk as he gears up for the release of his first out and out action film #Pathaan
You can’t miss this one! pic.twitter.com/QzRvEZZt3T— Yash Raj Films (@yrf) January 18, 2023
“मी 32 वर्षांपूर्वी फिल्म इंडस्ट्रीत आलो होतो. या इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करत असताना मला ॲक्शन हिरो बनायचे होते. मात्र, ॲक्शन हिरोच्या जागी मी रोमँटिक हिरो झालो आहे. मला माझ्या राज आणि राहुल यासारख्या भूमिका आवडतात. मात्र, मला नेहमी वाटतं की मी एक ॲक्शन हिरो आहे. ‘पठाण’च्या माध्यमातून ॲक्शन हिरो बनण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं आहे.”
दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ चित्रपटाची प्रेक्षक गेले अनेक दिवस झाले वाट बघत आहे. या चित्रपटातील पाहिलं गाणं ‘बेशर्म रंग’ रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. या गाण्यातील काही शॉट्समध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घातली आहे. तिच्या त्या आऊटफिटवर अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे. या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी देखील अनेकांकडून झाली.
‘बेशर्म रंग’ या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घालून भगव्या रंगाचा अपमान केला आहे, असं अनेकांचं म्हणणं होतं. त्यामुळे या चित्रपटाला खूप विरोध झाला होता.
संत परमहंस आचार्य या गाण्यावर टीका करत म्हणाले होते, “हा सिनेमा म्हणजे जिहाद असून, हे एक मोठे षडयंत्र आहे. त्यामुळे आम्ही शाहरुख खानचे पोस्टर जाळले आहे. मला जर शाहरुख खान दिसला, तर मी त्याला जिवंत जाळून टाकेल. त्याचबरोबर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला तर तो पेटवून दिला जाईल. आता सध्या आम्ही फक्त शाहरुख खानचे पोस्टर जाळले आहे. तो जरा मला सापडला तर आम्ही त्याला जिवंत जाळू. आम्ही सध्या शाहरुख खानच्या शोधात आहोत. तो जर आम्हाला सापडला, तर आम्ही त्याची चांगलीच सोय बघू.”
महत्वाच्या बातम्या
- Supriya Sule | “मला त्यांची काळजी वाटते, ते ग्रामपंचायत निवडणूक असली तरी…”; सुप्रिया सुळेंचा मोदींना खोचक टोला
- Rakhi Sawant | …म्हणून राखी सावंतला केलं अटक; थोड्याच वेळात करणार कोर्टात हजर
- Shivsena | “मगरीने बेडूक गिळावा असे मिंधे सराकर…”; शिवसेनेची भाजपवर आगपाखड
- Arvind Sawant | लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून अरविंद सावंत म्हणाले, “माननीय तर सोडा, माझ्या नावापुढे…”
- Periods Cramps | मासिक पाळीमध्ये होणाऱ्या पाठदुखीपासून मुक्त होण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय