Rakhi Sawant | मुंबई: बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant ) सध्या सतत चर्चेत आहे. राखीने नुकताच तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्राणीसोबत निकाह केला आहे. लग्नानंतर तिने इस्लाम धर्म कबूल केल्याचं देखील स्पष्ट केलं आहे. अशात राखी सावंतबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आंबोली पोलिसांकडून राखी सावंतला अटक करण्यात आली आहे.
अभिनेत्री राखी सावंतला अटक करण्यात आली आहे. एका प्रायव्हेट मॉडेलचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. थोड्याच वेळात तिला अंधेरी कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोपडाने ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.
BREAKING NEWS!!!
AMBOLI POLICE HAS ARRESTED RAKHI SAWANT IN RESPECT WITH FIR 883/2022
YESTERDAY, RAKHI SAWANT’S ABA 1870/2022 WAS REJECTED BY MUMBAI SESSIONS COURT
— Sherlyn Chopra (शर्लिन चोपड़ा)🇮🇳 (@SherlynChopra) January 19, 2023
राखी सावंत आणि शर्लिन चोपडा यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद-विवाद सुरू आहे. बिग बॉस 16 मध्ये साजिद खानला घेतल्याबद्दल शर्लिनने निर्मात्यांवर नाराजी व्यक्त केली होती. शर्लिन म्हणाली होती, “ज्या व्यक्तीने अनेक मुलींचे शोषण केले आहे, त्याला या शोमध्ये येण्याचा अधिकार नाही.” त्यानंतर तिने साजिद खान विरोधात पोलीस तक्रार देखील दाखल केली होती.
राखी सावंत साजिद खानला आपला भाऊ मानते. त्यामुळे शर्लिन आणि राखी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. शर्लिनने साजिद खानवर केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहे, असं राखी सावंतने म्हटलं होतं. त्याचबरोबर मीडियासोबत बोलताना राखीने शर्लिनबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. राखीच्या या असभ्य वक्तव्यामुळे शर्लिनने तिच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. राखी सावंतला थोड्या वेळात अंधेरी कोर्टात हजर केलं जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून राखी सावंतच्या लग्नाबद्दल चांगल्याच चर्चा रंगल्या आहे. तिचे बॉयफ्रेंड आदिल दुर्राणीसोबतचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. राखीने सात महिन्यांपूर्वीच लग्न केलं होतं. मात्र, तिने ते सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर आल्यानंतर राखीने तिचं लग्न जाहीर केलं होतं. लग्नानंतर राखीने इस्लाम धर्म स्वीकारण्याची कबुली दिली होती. त्याचबरोबर लग्नानंतर तिनं तिचं नाव ‘फातिमा’ ठेवलं आहे.
बॉलीवूड ड्रामा क्वीन म्हणजेच राखी सावंत “मै हू ना”, “मस्ती”, “दिल क्या करे”, “ओम शांती ओम”, “बॉम्बे टू गोवा”, “क्रिश थ्री”, “जिस देश मे गंगा रहता है”, “ना तुम जानो ना हम” इत्यादी चित्रपटांमध्ये झळकली होती. त्याचबरोबर राखी छोट्या पडद्यावरील अनेक रियालिटी शोमध्ये दिसली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Shivsena | “मगरीने बेडूक गिळावा असे मिंधे सराकर…”; शिवसेनेची भाजपवर आगपाखड
- Arvind Sawant | लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून अरविंद सावंत म्हणाले, “माननीय तर सोडा, माझ्या नावापुढे…”
- Periods Cramps | मासिक पाळीमध्ये होणाऱ्या पाठदुखीपासून मुक्त होण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
- Parth Pawar | अजित पवारांचे सुपुत्र राष्ट्रवादीत नाराज?; घेतली शंभुराज देसाईंची भेट, पडळकर म्हणतात…
- Chhota Rajan | छोटा राजनचा भाऊ सर्वच निवडणुका लढवणार?; आरपीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड