Periods Cramps | मासिक पाळीमध्ये होणाऱ्या पाठदुखीपासून मुक्त होण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Periods Cramps | टीम महाराष्ट्र देशा: मासिक पाळी (Periods) ही स्त्रियांमध्ये होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. नियमित मासिक पाळी येण्याचा अर्थ असा होतो की स्त्रियांच्या शरीराने गर्भधारणेची क्षमता मिळवण्याची पहिली पायरी ओलांडली आहे. त्याचबरोबर मासिक पाळीची सुरुवात होणे म्हणजे लैंगिक व्यवस्थेची सुरुवात होणे होय. महिलांना दर महिन्याला मासिक पाळीला सामोरे जावे लागते. मासिक पाळी सुरू असताना महिलांना पाठदुखीची समस्या निर्माण होते. मासिक पाळीत होणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी महिला अनेकवेळा वेगवेगळ्या प्रकारचे औषधे घेतात. मात्र, हे औषध शरीरासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे मासिक पाळीत होणाऱ्या पाठदुखीवर मात करण्यासाठी महिला पुढील घरगुती उपाय करू शकतात.

योग्य आहार

मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी महिलांनी योग्य आहाराचे सेवन केले पाहिजे. मासिक पाळी सुरू असताना महिलांनी आहारात हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, सोयाबीन, फळे इत्यादी गोष्टींचे सेवन केले पाहिजे. त्याचबरोबर मासिक पाळीमध्ये महिलांनी बाहेरचे फास्ट फूड खाणे टाळले पाहिजे. योग्य आहार ग्रहण केल्याने महिलांची मासिक पाळीमधील पाठदुखीची समस्या दूर होऊ शकते.

हळदीचे दूध

हळदीचे दूध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. या दुधाच्या सेवनाने थकवा दूर होतो. त्याचबरोबर मासिक पाळीमध्ये हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने महिलांना पाठदुखीच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

पुरेशी झोप

काही वेळा मासिक पाळीमध्ये पुरेशी झोप न घेतल्याने पाठदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान शरीराला पुरेशी विश्रांती देणे गरजेचे असते. पुरेशी झोप झाल्याने पाठदुखीची समस्या कमी होऊ शकते. मासिक पाळीमध्ये व्यवस्थित झोप झाल्याने स्नायू दुखणे देखील कमी होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या