Share

UPSC Recruitment | तरुणांनो लक्ष द्या! UPSC च्या ‘या’ पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

UPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) च्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर! केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी यांच्यामार्फत केंद्र सरकार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी पदांनुसार इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी पदानुसार पात्रधारक … Read more

Published On: 

UPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) च्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर! केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी यांच्यामार्फत केंद्र सरकार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी पदांनुसार इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवार upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

यूपीएससी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 112 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या 112 रिक्त जागांमध्ये उपायुक्त, सहायक संचालक, रबर उत्पादन आयुक्त, शास्त्रज्ञ ‘बी’, वैज्ञानिक अधिकारी, मत्स्य संशोधन तपास अधिकारी, जनगणना संचालन सहायक संचालक, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, उप विधी सल्लागार, सहायक अभियंता आणि वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी आदी पदांचा समावेश आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरविण्यात आली आहे. पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट घ्यावी.

यूपीएससीयांच्या मार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार पात्रधारक उमेदवार 2 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या पदांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही