संतुलित आहारात भरड धान्याची गरज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
संतुलित आहार – हरित क्रांतीमुळे देशाच्या अन्नधान्य उत्पादनात बरीच वाढ झाली; मात्र त्यामुळे शेतकरी पारंपरिक पिकांपेक्षा नकदी पिकांकडे अधिक वळू लागला. गेल्या काही वर्षांपासून जागतिक हवामान पालटाचा फटका शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. ‘आधुनिक जीवनशैली’च्या नावाखाली अनेकांच्या आहाराच्या सवयीत पालट झालेले आहेत.
आहारातील महत्त्व जाणून घेऊन त्यांचा वापर दैनंदिन आहारामध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी या धान्याचे लाभ जनसामान्यांच्या मनावर विविध स्तरांतून बिंबवणे आवश्यक आहे. भरड धान्य पिकांची वैशिष्ट्ये म्हणजे ही अल्प पावसाच्या परिस्थितीत शुष्क आणि अर्ध-शुष्क भागात वाढतात. भरड धान्य पिके ही बहुतांश पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या जमिनीवर घेतली जातात. हवामानाशी जुळवून घेणारी ही पिके भारतात निमशुष्क हवामानापर्यंत सीमित आहेत. तापमानाच्या वैविध्यतेशी, आर्द्रता आणि स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेणारी ही पिके लाखो कोरडवाहू शेतकर्‍यांना अन्न, पशुधनाला खाद्य, अल्कोहोलनिर्मितीसाठी महत्त्वाचा कच्चा माल पुरवणारा घटक आणि औद्योगिक देशांना ‘स्टार्च’ उत्पादन पुरवतात.
भारतीय उपखंडात भरड धान्य पिके म्हणजे पोषकद्रव्यांचे भांडार असलेली उत्कृष्ट धान्ये मानली जातात. सर्व प्रकारच्या भरड धान्यांमध्ये ‘अ‍ॅण्टिऑक्सिडंट’ घटक विपुल प्रमाणात असून ही धान्ये ‘ग्लुटेन’मुक्त असतात आणि अ‍ॅलर्जीकारक नसतात. परिणामी, गेल्या काही काळात आहार पद्धतीमध्ये हळूहळू बदल घडत असून वाढती ग्राहक मागणी या भरड धान्यासाठी संभाव्य बाजारपेठ निर्माण करत आहे.
जागतिक व्यासपीठावर भरड धान्याची पौष्टिक गुणवत्ता ठळक करण्याच्या उद्देशाने, 2023 हे भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र महासभेने ‘भरड धान्याचे आंतरराष्ट्रीय वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. निःसंशयपणे, अन्न ही जीवनाची गरज आहे परंतु चांगल्या आरोग्यासाठी विविध पोषक तत्वांचा समतोल आहार घेणे देखील आवश्यक आहे. पौष्टिक गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून भरड धान्याला ‘पोषणाचे पॉवरहाऊस’ म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.

भरड धान्यात ज्वारी, बाजरी, राजगिरा, कुटकी, सावा, राळा, वरई (भगर),  ज्वारी, हरभरा, जव, राजगिरा, कुरी, कांग ,बटी ,, नाचणी इ. पिके या वर्गवारीत येतात.

ऐतिहासिक संदर्भातील संशोधनात असे दिसून येते की मानवी  सभ्यतेच्या विकासाच्या काळात, शेतीच्या लागवडीची सुरुवात फक्त भरड धान्यापासून झाली. 3000 ईसापूर्व सिंधू संस्कृतीच्या काळातही त्यांच्या उत्पत्तीचे पुरावे सापडले आहेत. आजही जगातील 131 देशांमध्ये बाजरीची लागवड केली जाते. भरड धान्य हे आशियाई आणि आफ्रिकन देशांतील सुमारे 590 दशलक्ष लोकांचे पारंपारिक अन्न आहे. त्यांच्या जागतिक उत्पादनात भारताचा वाटा 20 टक्के आहे तर आशियाई स्तरावर हा वाटा 80 टक्के आहे.  भरड धान्याना गरिबांचे अन्न मानले गेले असले तरी त्यांच्या गुणवत्तेशी संबंधित अनेक संशोधनांतून हे सिद्ध झाले आहे की, पोषणाच्या बाबतीत भरड धान्याला तोड नाही.
हार्वर्ड इन्स्टिट्यूटच्या महिलांवरील 10 वर्षांच्या अभ्यासानुसार, असे दिसून आले की ज्या स्त्रिया दररोज 35 ते 50 ग्रॅम भरड  धान्य त्यांच्या उत्पादनांचे आहारात सेवन करतात त्यांच्या हृदयविकाराचा झटका ,हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 30 टक्के कमी होते. त्याच वेळी, 1.60 लाख महिलांवर 18 वर्षे केलेल्या अभ्यासानुसार, दररोज सरासरी 50 ग्रॅम भरड धान्य खाणाऱ्या महिलांमध्ये टाइप-2 मधुमेहाचा धोका 30 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्याचप्रमाणे, 5 लाख महिला आणि पुरुषांवर 5 वर्षांच्या अभ्यासानंतर असा निष्कर्ष काढण्यात आला की भरड धान्य खाल्ल्याने कोलन कॅन्सरचा धोका 21 टक्क्यांनी कमी होतो, कारण त्यात असलेले फायबर आतडे निरोगी ठेवते. मेयो क्लिनिकच्या मते, भरड धान्य केवळ वाईट कोलेस्ट्रॉल कमी करत नाही आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते,व  इन्सुलिनची पातळी संतुलित करण्यास आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. होल ग्रेन्स कौन्सिलच्या मते, दररोज 50 ग्रॅम किंवा त्याहून अधिक भरड धान्य किंवा त्यापासून बनवलेल्या उत्पादनांचे सेवन केल्याने अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. हार्ट फाउंडेशनच्या मते, सकाळच्या नाश्त्यात याचे सेवन करणे सर्वात फायदेशीर मानले जाते.
भरड धान्याच्या स्वरूपात अंकुरलेले हरभरे प्रत्येक दृष्टीकोनातून फायदेशीर आहे. बाजरी हा कॅल्शियम, प्रथिने, लोह आणि मॅग्नेशियमचा प्रमुख स्त्रोत आहे. ज्वारी ग्लुटेन मुक्त आहे, त्यात प्रामुख्याने फॉस्फरस, मॅग्नेशियम, रिबोफ्लेविन असते. व्हिटॅमिन बी-2, बी-6, झिंक आणि मॅग्नेशियम राजगिरामध्ये मुबलक प्रमाणात आढळते. नाचणीमध्ये लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. शेतीच्या रूपाने त्यांना शेतकरी अनुकूल पिके असेही म्हणता येईल. ही धान्ये पाण्याची टंचाई, रोगराई इत्यादी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम आहेत. ते साठवून संग्रहित करणे सोपे आहे आणि बर्याच काळासाठी उपयुक्त स्थितीत राहतात.
सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की बाजरी, ज्याचा भारतीय आहारातील 40 टक्के वाटा आहे, त्यांचे अनेक फायदे असूनही, हरित क्रांतीनंतर सामान्य भारतीय थाळीचा भाग बनण्यात मागे पडले आहेत. त्यांची जागा गहू आणि तांदूळाने घेतली. एका दशकापूर्वी खेड्यापाड्यात आणि शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे समोर आले होते की 10 टक्क्यांहून कमी लोक भरड धान्य खाण्यात रस दाखवतात.
2018 मध्ये, त्यांना भरड धान्य शेतीला चालना देऊन भारत सरकारने ‘पोषण धान्य’ चा दर्जा दिला. 154 विकसित वाण तयार करण्यात आले होते, जे उत्पादकतेच्या पातळीवर चांगले होते आणि रोगांशी लढण्यास अधिक सक्षम होते. पौष्टिक भरड तृणधान्ये देखील केंद्र सरकारच्या ‘मध्यान्ह भोजन योजने’चा एक भाग बनवण्यात आली होती.
कमी खर्चात भरडधान्याचे उत्पादन हे लहान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकते, हे निश्चितच, आहे  सरकारी खरेदीत त्यांचा सहभाग वाढवण्याबरोबरच किमान आधारभूत किमतीवर खरेदीही सुनिश्चित करावी लागेल. यासोबतच चांगल्या वाणांचा विकास आणि दर्जा सुधारण्यावर अधिक भर द्यावा लागणार आहे. शास्त्रोक्त उपचार आणि रास्त भावाची हमी शेतकऱ्यांना भरड धान्य उत्पादनासाठी नक्कीच प्रोत्साहन देईल.
या दिशेने पुढाकार घेऊन त्याच्या निर्यातीकडेही लक्ष दिले जात असले तरी अर्थपूर्ण प्रयत्नांसोबत पुरेशी जनजागृती झाली तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी बाजारपेठ विकसित होऊ शकते. यामुळे जागतिक दर्जाच्या पोषण अभियानाला बळकटी तर मिळेलच, पण शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही मजबूत होईल.
विकास परसराम मेश्राम
मु+पो,झरपडा
ता अर्जुनी मोरगाव
जिल्हा गोदिया मोबाईल

महत्वाच्या बातम्या