Share

मनसेला रायगडमध्ये मोठा धक्का!; 55 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

रायगड मनसेतील जिल्हाध्यक्ष नियुक्तीवरून नाराजी वाढली असून, संदीप ठाकूर यांच्या राजीनाम्यानंतर 55 पदाधिकाऱ्यांनीही सामूहिक राजीनामे दिले आहेत.

Published On: 

Raj Thackeray

मुंबई : राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) रायगडमध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे. जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून सुरू झालेली नाराजी आता उघडपणे समोर आली आहे. पक्षातील 55 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे (MNS leaders resign) दिल्याची माहिती समोर आली आहे.

मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर (Sandip Thakur) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रायगड मनसेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या संदीप ठाकूर यांना डावलून रामचंद्र उर्फ बाळा म्हात्रे (Ramchandra Urf Bala Mhatre) यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर पक्षात नाराजी निर्माण झाल्याची चर्चा सुरू होती. संदीप ठाकूर यांच्या राजीनाम्यानंतर आता तब्बल 55 पदाधिकाऱ्यांनीही पक्षाच्या विविध पदांचा राजीनामा दिल्याने रायगड मनसेमध्ये मोठी फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हाध्यक्ष नियुक्तीवरून नाराजी

माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील (Jitendra Patil) यांनीही सोशल मीडियावरून अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून पक्षांतर्गत मतभेद वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

दरम्यान, संदीप ठाकूर यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेतल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चांना उधाण आले आहे. मात्र, ही भेट कौटुंबिक स्वरूपाची होती आणि त्याचा राजकारणाशी संबंध नसल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.

“कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार”

आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत बोलताना संदीप ठाकूर यांनी सांगितले की, कोणासोबत काम करायचे याबाबत आपण महिनाभर विचार केला आहे. लोकांमध्ये राहून लोकहितासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्हाला सोबत घेऊन जाणारे नेतृत्व संधी देत असेल तर त्याचा विचार करू, असे त्यांनी म्हटले.

तसेच अंतिम निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतला जाईल, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले. रायगड मनसेतील या घडामोडींमुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर परिणाम होणार का? आणि संदीप ठाकूर यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल?, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही