Congress | “…त्याला आपण देहविक्री म्हणतो, मग स्वत:ला विकणाऱ्या आमदारांना…”; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्यावरुन वाद

Congress | बंगळुरु : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरुच आहे आहे. त्यात दोन्ही बाजूंच्या नेतेमंडळी आणि आमदारांकडूनही एकमेकांवर टीका करताना पातळी सोडून वक्तव्य केल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हरिप्रसाद यांनी पक्षांतर करणाऱ्या आमदारांची तुलना अप्रत्यक्षपणे देहविक्री करणाऱ्या महिलांशी केल्याचे बोलले जात आहे.

“जेव्हा जनता कुठल्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत देत नाही, तेव्हा आम्ही राजकीय पक्ष आघाडीचं सरकार स्थापन करतो. पण आपल्या उदरनिर्वाहासाठी देहविक्री करणाऱ्या महिलांना आपण वेगवेगळी नावं देतो. त्यांना आपण वेश्याही म्हणतो. पण आता स्वत:ला विकणाऱ्या आमदारांना काय म्हणायचं, हे मी तुमच्यावर सोपवतो. इथल्या स्थानिक आमदारांना चांगला धडा शिकवा”, असे हरिप्रसाद आपल्या भाषणात म्हणाले आहेत.

कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीकडून होसीपेटच्या डॉ. पुनीत रादकुमार स्टेडियमवर आयोजित केलेल्या सभेमध्ये हरिप्रसाद यांनी सत्ताधारी भाजपवर आणि भाजपमध्ये गेलेल्या काँग्रेस आमदारांवर सडकून टीका केली. टीका करताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी या आमदारांना उद्देशून एक वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.