Shivsena | “याचा अर्थ सगळे भाजप धुतल्या तांदळासारखे”; सेनेने जाहीर केली ईडीची चौकशी झालेल्या नेत्यांची नावे

Shivsena | मुंबई : 2004 पासून ‘ईडी’कडून चौकशी झालेल्या राजकीय नेत्यांची यादी इंडियन एक्स्प्रेसच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती युवासेना विधानसभा चिटणीस सागर मस्के यांनी दिली आहे. ईडीकडून कारवाई करण्यात आलेल्या नेत्यांची नावांची यादी सागर मस्के यांनी  जाहीर केली आहे. यादी जाहीर करताना मस्के यांनी भाजपचा एकही नेत्याचे नाव या यादीमध्ये नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

2014 पासून ‘ईडी’ने विरोधकांवर केलेल्या कारवाईची पक्षनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे काँग्रेस (24), तृणमूल काँग्रेस (19), राष्ट्रवादी काँग्रेस (11), शिवसेना (8), द्रमुक (6), बिजू जनता दल (6), राजद (5), बसप (5), समाजवादी पक्ष (5), तेलगू देसम पार्टी (5), आप (3), इंडियन नॅशनल लोकदल (3), वायएसआर काँग्रेस (3), मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष (2), नॅशनल कॉन्फरन्स (2), पीडीपी (2), अण्णा द्रमुक (1), मनसे (1), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (1) तेलंगणा राष्ट्र समिती (1) आणि अपक्ष (2) या यादीमध्ये एकही भाजपेई राजकारणी नाही. याचा अर्थ सगळे भाजपेई राजकारणी धुतल्या तांदळा सारखे स्वच्छ आहेत, असा सामान्य लोकांनी घ्यावा काय…?, असा संतप्त सवाल सागर मस्के यांनी केला आहे.

“या यादीमध्ये एकाही भाजप नेत्याचे नाव नाही आणि तरी भाजप म्हणणार ईडी ही स्वायत्त संस्था आहे. ईडीने केलेल्या कारवाईमागे आमचा हात नाही. किती दांभिकपणा करावा तो! यावरून भाजपेई हे कुटिल कारस्थान करण्यात किती कपटी आहेत हे स्पष्ट होते, असा गंभीर आरोपही यावेळी सागर मस्के यांनी केला आहे.

SHIVSENA VS ED & BJP

महत्वाच्या बातम्या :

Back to top button