Nana Patole | “भाजपासारख्या हुकूमशाही व्यवस्थेला संपवण्यासाठी…”; नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात

Nana Patole | मुंबई :  राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलच तापलेलं आहे. एकीकडे शिंदे विरुद्ध ठाकरे गट असा कलगीतुरा रंगलेला आहे. तर दुसरीकडे विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. त्यातच राज्यात पाच विधान परिषद निवडणुकांची देखील जोरदार तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपासारख्या हुकूमशाही व्यवस्थेला संपवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून या निवडणुका लढतो आहोत असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले, “जागा शिवसेनेला जाते आहे की काँग्रेसला की राष्ट्रवादीला हा आमचा प्रश्न नाही. भाजपाची हुकूमशाही व्यवस्था संपवणं हे आमचं लक्ष्य आहे त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत.”

दुसऱ्याची घरं फोडायची हि भाजपची खेळी आहे. मटार त्यात भाजपाच अडकली असल्याचं ते यावेळी बोलताना म्हणाले. “महाविकास आघाडी म्हणून आमची भूमिका लवकरच मांडू, असंही त्यांनी सांगितलं. सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याबाबत ते म्हणाले, बंडखोराला पाठिंबा देणार नाही त्यामुळे सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच संपला आहे.”

महत्वाच्या बातम्या :