Supriya Sule | “फक्त सत्तेतील दिवस चांगले नसतात, तर…”; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

Supriya Sule | पुणे : खासदार सुप्रिया सुळे या इंदापूर (Indapur) तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. इंदापूर तालुक्यातील कौठाळी येथे विकास कामांचा शुभारंभ केला. या वेळी सुप्रिया सुळे यांनी विधवा महिलांना कुंकू लावून शुभारंभ केला. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधातले दिवस देखील चांगले असल्याचं म्हंटल आहे.

“फक्त सत्तेतील दिवस चांगले असतात, असे नाही. विरोधातील दिवसही चांगले असतात. मला विरोधात भाषण करायला आवडते. पण दररोज टीका करून मी थकले आता. हे रोज चुकतात म्हणून रोज टीका करावी लागते, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलेत.

विधवा महिला हळदी कुंकू या विषयावर बोलताना त्या म्हणाल्या, ‘या महिला खूप अडचणीतून जगत असतात. हळदी कुंकू हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे. एकल शब्द वापरावा पण विधवा म्हणू नका. अशा महिला कधी कुंकू लावत नाहीत. म्हणून मी ज्या ठिकाणी जाते त्या महिलांना कुंकू लावायला सांगते.

दरम्यान, नवाब मलिक यांच्यावरील कारवाईसंदर्भात देखील त्यांनी यावेळी भाष्य केलं. ‘काही कुटुंब अशी आहेत की त्यांच्यावर सारख्याच तक्रारी होतात. त्याच्यात मला काही आश्चर्य वाटत नाही. हे सुडाचे राजकारण असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :