Ashok Chavan | “माणसं फोडायची आणि…”; सत्यजीत तांबेंच्या बंडखोरीवर अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले?

Ashok Chavan | मुंबई : नाशिक पदवीधर मतदार संघातून काँग्रेसकडून (Congress) सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, नाट्यमय घडामोडीनंतर सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज  दाखल केला. परंतु काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळूनही सुधीर तांबे यांनी अर्ज भरलाच नाही.

भाजपनं शेवटपर्यंत उमेदवार घोषित केला नाही. उलट सत्यजीत तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास त्यांना तात्काळ पाठिंबा देण्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यामुळं हे सगळं घडवून आणण्यामागे भाजपचा हात होता, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. हा वाद सुरू असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील फोडाफोडीमागे भारतीय जनता पार्टी असल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केला आहे. माणसं फोडायची आणि मतं घ्यायची, ही भाजपाची रणनीती आहे, अशी खोचक टीका त्यांनी भाजपवर केली आहे. विधान परिषद निवडणुकीतही मतं फोडण्याचं काम भाजपानेच केलं आहे. हे काही लपून राहिलं नाही. असाच प्रयोग मागच्या विधान परिषद निवडणुकीत झाला. नाशिकमध्येही तोच प्रयोग भाजपाच्या वतीने काही प्रमाणात झाला असल्याचं अशोक चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “नेत्यांमध्ये वाद विवाद नसतात. त्यांच्या काही अपेक्षा असतात. ते पदासाठी इच्छुक असतात. कुणाला पक्षाकडून तिकिट मिळावं, असं वाटत असतं. तर कुणाला अपक्ष निवडणूक लढवायची असते. असे प्रश्न सामजस्यांने सोडवायचे असतात.”

महत्वाच्या बातम्या :