Share

Eknath Shinde | “जगभरात मोदींची छाप”; दावोसहून परतल्यावर मुख्यमंत्र्याची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

🕒 1 min readEknath Shinde | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दोन दिवसांसाठी दावोस येथे गेले होते. या दौऱ्यानंतर महाराष्ट्रात कोट्यवधींचे उद्योग आल्याचंही त्यांनी सांगितलं. दावोस दौऱ्याचं वैशिष्ट्य सांगताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ जगभरातले विविध देशातले लोक त्या ठिकाणी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत देशाची दावोसच्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमवर छाप पहायला मिळाली. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Eknath Shinde | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दोन दिवसांसाठी दावोस येथे गेले होते. या दौऱ्यानंतर महाराष्ट्रात कोट्यवधींचे उद्योग आल्याचंही त्यांनी सांगितलं. दावोस दौऱ्याचं वैशिष्ट्य सांगताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ जगभरातले विविध देशातले लोक त्या ठिकाणी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत देशाची दावोसच्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमवर छाप पहायला मिळाली.

दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. या दौऱ्याबाबात मी आनंदी आणि समाधानी आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) माध्यमांशी बोलताना म्हणाले.

प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असल्याचे दिसते असे सांगून या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच हे सामंजस्य करार फक्त कागदावरच राहणार नसून ते प्रत्यक्षात उतरतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

पुढे ते म्हणाले, “भारतात आणि महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची सर्वांना इच्छा होती. विविध देशाच्या लोकांना मी भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली. सिंगापूर, सौदी इतर देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली. त्यांना आवर्जून महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली. राज्यासाठी ही मोठी अचिव्हमेंट आहे. विविध सेक्टरमध्ये गुंतवणुकीसाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या