Share

Breaking News : धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा! NEET आंदोलनाला मोठं यश

NEET पेपरफुटी प्रकरणावरून वाढत्या राजकीय दबाव आणि देशभरातील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर केला.

Published On: 

D Pradhan

दिल्ली : NEET परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटणे आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ यांमुळे मोठ्या प्रमाणावर टीकेचे धनी ठरलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी अखेर आज आपल्या पदाचा राजीनामा (Resign) दिला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. NEET प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावरून ‘कॉकरोच जनता पार्टी'(CJP)च्या नेतृत्वाखाली जंतर-मंतरवर (JantarMantar) सुरू असलेले आंदोलन (Protest) आणि त्याला मिळणारा देशभरातील पाठिंबा पाहता, प्रधान यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला.

NEET प्रश्नपत्रिका फुटल्यापासूनच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी होत होती. या मुद्द्यावरून ‘कॉकरोच जनता पार्टी’ने दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन सुरू केले होते. याव्यतिरिक्त, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनीही प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुमारे २६ दिवस उपोषण केले होते. दरम्यान, प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ने संसदेकडे काढलेला मोर्चा हिंसक बनला आणि पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. त्यानंतर या आंदोलनाला विविध क्षेत्रांतून वाढता पाठिंबा मिळू लागला.

अखेरीस, धर्मेंद्र प्रधान यांनी आज दुपारी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तो सादर केला. आता आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान हा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवतील.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही