Devendra Fadnavis | “त्यांची दुकानदारी बंद होईल म्हणून ओरड सुरू आहे”; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार

Devendra Fadnavis | मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  हे उद्या मुंबई दौऱ्यावर असून बीकेसी मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेची भाजप आणि शिंदे गटाने जय्यत तयारी केली आहे. सभेला तब्बल दीड लाख लोक येणार असून त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे.

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बीकेसीवर जाऊन कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटावर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी टीका केली होती. त्यावरही त्यांनी पलटवार केला आहे.

“ज्यांची हयात घोटाळे करण्यात झाली. त्यांना दु:ख होत आहे. काँक्रिटचे रस्ते केले तर 40 वर्ष रस्तेच होणार नाही. त्यामुळे यांची दुकानदारी बंद होईल. यांची दुकानदारी बंद करण्याचे काम हे काँक्रिटचे रस्ते करत आहेत. त्यामुळे त्यांची ओरड सुरू आहे”, असा खोचक टोला फडणवीस यांनी लगावल्याचे पाहायला मिळाले आहे.

मी मुख्यमंत्री असताना महापालिकेच्या रस्त्यांची चौकशी झाली होती. त्यावेळी 200 रस्त्यांच्या खालील लेअरच गायब होती. ते आम्हाला रस्त्यांच्या मुद्द्यावरून बोलत आहेत. त्यांचा भ्रष्टाचार उखडून टाकण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत. पारदर्शक पदधतीने टेंडरींग केले आहे. जे आरोप लावले आहेत. त्याचे उत्तरही महापालिकेने दिले आहे. कोणत्या किंमतीत रस्ते होत आहेत यांचे दु:ख यांना होत नाहीये. तर त्या रस्त्यांमुळे यांची दुकानदारी बंद होईल, हेच यांचे दु:ख आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या