Travel Guide | गर्दी सोडून शांततेत फिरायला जायचं असेल, तर महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाला द्या भेट

टीम महाराष्ट्र देशा: रोजच्या दिनचर्यामधून प्रत्येकाला सुट्टी (Holiday) हवी असते. त्यामुळे महिन्यातून, सहा महिन्यातून प्रत्येक जण कुठेतरी शांततेच्या ठिकाणी फिरायला (Travel) जाण्यासाठी ट्रीप प्लॅन (Trip Plan) करत असतो. जर तुम्ही देखील आपल्या रोजच्या दिनचर्याला कंटाळून कुठेतरी शांत ठिकाणी फिरायला जायचं प्लॅन करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील एका निसर्गरम्य आणि शांत ठिकाणी बद्दल माहिती सांगणार आहोत.

सह्याद्री पर्वतरांसह नटलेल्या महाराष्ट्र मध्ये अनेक निसर्गरम्य ठिकाण आहे. तुम्ही जर या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या महाराष्ट्रात कुठे फिरायला जायचं प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ‘आंबोली हिल स्टेशन’ (Amboli Hills Station) एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. शांत आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या ठिकाणी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत जाऊ शकतात. त्याचबरोबर आंबोली हिल स्टेशनची ट्रिप एक बजेट फ्रेंडली ट्रिप आहे.

आंबोली हिल स्टेशनला फिरायला (Travel) गेल्यावर ‘या’ ठिकाणांना भेट द्या

आंबोली धबधबा

ज्या लोकांना निसर्गाच्या सानिध्यात राहायला आणि फोटोग्राफी करायला आवडते, त्यांच्यासाठी आंबोली मधील धबधबा हा एक सर्वोत्तम पर्याय असू शकतो. आंबोली धबधब्याच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर असून तिथे मनाला शांती मिळते. तुम्ही आंबोली धबधब्यावर फिरायला गेल्यास तेथील दृश्य तुम्हाला अविस्मरणीय अनुभव देतील.

आंबोलीचा माधव गड किल्ला

आंबोली हिल स्टेशनवर एक जुना किल्ला देखील आहे. या किल्ल्याचे नाव माधव गड किल्ला असे आहे. हिवराईने आणि निसर्गसौंदर्याने नटलेला हा माधवगड किल्ला प्राचीन काळातील एक वारसा आहे.

आंबोली शिरगावकर पॉईंट

आंबोली मधील व्यू पॉइंट म्हणून ओळखले जाणारे शिरगावकर पॉईंट हे सुंदर नैसर्गिक दृष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. आंबोली शिरगावकर पॉईंटला सनसेट आणि सनराइज् पॉईंट देखील म्हणतात. आंबोलीच्या बस स्थानकापासून हे ठिकाण जवळपास तीन किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण फोटोग्राफी करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.

Back to top button