Share

Udayanraje Bhosale | “शरद पवारांकडून ‘ही’ अपेक्षा नव्हती”; खासदार उदयनराजे भोसलेंची खोचक टीका

Udayanraje Bhosale | सातारा जिल्ह्यातील एकेकाळचे शरद पवारांचे विश्वासू सहकारी, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे आता हे अजित पवार गटात आहेत. वाई विधानसभा निवडणुकीत मकरंद पाटील भरघोस मतांनी विजयी झाले. सलग चौथ्यांदा निवडून आलेले मकरंद पाटील यांची पहिल्यांदाच मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर त्यांनी आज उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवार … Read more

Published On: 

Udayanraje Bhosale | "शरद पवारांकडून 'ही' अपेक्षा नव्हती"; खासदार उदयनराजे भोसलेंची खोचक टीका

Udayanraje Bhosale | सातारा जिल्ह्यातील एकेकाळचे शरद पवारांचे विश्वासू सहकारी, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे आता हे अजित पवार गटात आहेत. वाई विधानसभा निवडणुकीत मकरंद पाटील भरघोस मतांनी विजयी झाले. सलग चौथ्यांदा निवडून आलेले मकरंद पाटील यांची पहिल्यांदाच मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर त्यांनी आज उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी मकरंद पाटील यांच्या विरोधात प्रचार केला होता. यावर भाष्य करत उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

उदयनराजे म्हणाले, “मकरंद पाटील आणि मी कोणत्याही पदावर नसल्यापासून आमचे मैत्रीचे संबंध आहेत. मकरंद पाटील यांनी जनसेवा करण्यासाठी अहोरात्र काम केले. पण तरीही त्यांच्याविरोधात टोकाचा प्रचार का केला? हे समजायला मार्ग नाही.” तसेच शरद पवारांनी पाडा, पाडा, पाडा.. अशी भाषा वापरली. आम्हाला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती”, असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केली .

“शरद पवारांनी आजवर जे केले, ते काही एकट्याचे जोरावर केलेले नाही. शरद पवारांनाही वेळोवेळी अनेक नेत्यांची साथ लाभली. पवारांची पाठराखण करणाऱ्यांमध्ये लक्ष्मणराव तात्या हेही एक होते. पण तरीही मकरंद पाटील यांच्याविरोधात प्रचार केला गेला. त्यांचे काम नसते तर मी समजू शकलो असतो. पण पाटील यांचे चांगले काम आहे”, असेही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही