🕒 1 min read
Suresh Dhas | संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमध्ये आक्रोश सुरु असतानाच राज्यातही संतापाची लाट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत सभागृहात निवेदन दिलं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोणीही असला तरी त्याला शिक्षा होईल. तसेच मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी म्हटलं आहे. अशातच बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस हे देखील यासंदर्भात पाठोपाठ गौप्यस्फोट करत आहेत.
परळीत अनेक गायरान जमिनींवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. विटभट्ट्या, जमीन बळकावून त्यावर अवैध बांधकाम करून प्रचंड पैसा मिळवला जात असल्याचं ते यावेळी बोलताना म्हणाले. परळीसह जिल्ह्यातील अनेक प्रकरणांची मालिकाच त्यांनी बाहेर काढली आहे.
सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी, सपना चौधरी, रश्मिका मंदाना यांचे नाव घेत परळी पॅटर्न सांगितला. जमीन बळकावून त्यावर अवैध बांधकाम करून प्रचंड पैसा मिळवला जात आहे. त्यातून इव्हेंट मॅनेजमेंट केले जाते. यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांना इथे आणले जाते, असं म्हणत त्यांनी मुंडेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
“जर कुणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचे असेल त्यांनी परळीत यावे आणि याचा प्रसार देशभरात करावा”, असा टोला सुरेश धस यांनी लगावला आहे. यावर आता धनंजय मुंडे काही प्रत्युत्तर देतात का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Bajrang Sonavane। “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्री व्हावं, म्हणजे त्यांना अंधारात कोण काय…”; बजरंग सोनावणेंचा खोचक टोला
- Ajit Pawar | “अजितदादांनी लक्ष घातलं आहे तरी हत्येतील आरोपी मोकाट कसे?”; राष्ट्रवादीच्याच आमदाराचा परखड सवाल
- Santosh Deshmukh | “तुम्ही इथे आलात, तुमची संख्या बघून…”; आक्रोश मोर्चात संतोष देशमुखांच्या मुलीचे शब्द ऐकून सगळेच हळहळले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










