Share

Santosh Deshmukh | “तुम्ही इथे आलात, तुमची संख्या बघून…”; आक्रोश मोर्चात संतोष देशमुखांच्या मुलीचे शब्द ऐकून सगळेच हळहळले

Santosh Deshmukh | “तुम्ही इथे आलात, तुमची संख्या बघून..."; आक्रोश मोर्चात संतोष देशमुखांच्या मुलीचे शब्द ऐकून सगळेच हळहळले

Santosh Deshmukh । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येवरुन राजकारण तापलं आहे. बीड जिल्ह्यात संतापाची भावना आहे. विरोधी पक्षाकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आरोप होत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील रेणापूर येथे आज, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, तसच मुख्य आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचे शब्द ऐकून सगळेच गहिवरून आल्याचं चित्र पाहायला मिळालं. या मोर्चात संतोष देशमुख यांची दोन्ही मुलं सहभागी झाली होती.

मोर्चेकऱ्यांसमोर वैभवी भाषण करताना म्हणाली, “तुम्ही इथे आलात, तुमची संख्या बघून काय बोलावं ते सुचत नाहीय. तुम्ही असेच खंबीरपणे आमच्यामागे उभे राहा अशी विनंती करते. आज दु:खाच प्रसंग आहे, तुम्ही सर्व आमचं दु:ख वाटून घेण्यासाठी आला आहात.”

“माझ्या वडिलांसोबत काय झालं, हे तुम्हा सर्वांना माहित आहे. त्यांची क्रूर हत्या झाली. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही सर्व मोठ्या संख्येने आलात तसेच कायम आमच्यासोबत राहा. आज आमचं छत्र हिरावलं आहे, दुसऱ्या कुठल्या मुला-मुलीसोबत असं होऊ नये, आज आमच्या कुटुंबावर जी वेळ आली, तशी वेळ पुन्हा कुठल्या कुटुंबावर येऊ नये,” असं वैभवी म्हणाली.

“मी तुम्हाला माझ्या परिवाराचा हिस्सा मानते. प्रत्येक मोर्चाला या, माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. जे आरोपी आहेत, त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. माझ्या वडिलांसोबत जो गुन्हा झाला, तो पुन्हा घडू नये याची दक्षता घ्या. माझे वडिल आम्हाला सोडून गेलेत. तुम्ही एक कुटुंब म्हणून साथ द्या, सदैव आमच्या पाठिशी उभे राहा”, असं आवाहन वैभवीने मोर्चेकरांना केलं.

“वडिलांना न्याय मिळावा यासाठी मी कुठल्याही मोर्चात सहभागी व्हायला तयार”

“माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना अटक करुन त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. चार जणांना अटक झाली आहे. आणखी तिघांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. शनिवारी होणाऱ्या मोर्चात मी सहभागी होणार, माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी कुठल्याही मोर्चात सहभागी व्हायला तयार आहे”, असं वैभवी देशमुखने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, तसच मुख्य आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचे शब्द ऐकून सगळेच गहिवरून आल्याचं चित्र पाहायला मिळालं.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now