Anjali Damania । छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात भाषण केले. त्यांनी राज्याच्या विविध मुद्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर (Santosh Deshmukh murder case) भाष्य केले.
“बीडमध्ये देशमुखांना क्रौर्याने मारले. जे घडले कंपनीच्या राखेवरून घडले, राखेतून फिनिक्स पक्ष जन्माला येतो असे म्हणतात. पण बीडमध्ये राखेतून गुंड जन्माला येतात. कराडच्या लोकांनी देशमुखांना मारलं. त्यावर कोणीतरी पुढे केलं वंजाऱ्यांनी मराठा माणसाला मारलं. मारणाऱ्याची आणि ज्यांचा मृत्यू झाला त्यांची जात कशी काय निघू शकते?,” असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांच्या विधानावरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे.
Anjali Damania post on X
अंजली दमानिया X वर लिहितात, “राज ठाकरे यांचे भाषण ऐकत होते.अप्रतिम! सगळे मुद्दे अतिशय सुंदर मांडले. तो प्रत्येक मुद्दा मांडण्याची खरंच गरज होती. चांगल्या राज्यकर्त्यांमध्ये जे गुण हवेत, ते ह्या व्यक्तीमध्ये आहेत, ते फक्त कृतीत येत नाहीत. आले, तर त्याचे स्वागत,” असा टोला अंजली दमानिया यांनी लगावला.
“मी अनेक वेळा त्यांच्यावर टीका केली आहे, पण आजच्या भाषणाची प्रशंसा मी नक्कीच करेन. खरं बोलायला हिम्मत लागते, जी त्यांच्यामध्ये नक्कीच आहे,” असेही अंजली दमानिया म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या :