Share

छावा सिनेमावर Sikandar पडला भारी? पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

There is talk that Salman Khan’s recently released film Sikandar will break the record of actor Vicky Kaushal film Chhaava.

by MHD

Published On: 

Sikandar Movie Box Office Collection in Day 1

🕒 1 min read

Sikandar । बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) सिकंदर या सिनेमाची चर्चा सध्या सगळीकडे पाहायला मिळत आहे. कालच बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा रिलीज झाला. पहिल्याच दिवशी या सिनेमाने चांगली कमाई केली.

यामुळे सलमान खानचा नुकताच रिलीज झालेला सिकंदर हा सिनेमा अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) छावा (Chhaava) या सिनेमाचा रेकॉर्ड मोडणार असल्याची चर्चा सुरु आहे. या सिनेमाने सर्व भाषांमध्ये बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 26 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

पण विकी कौशलच्या छावा या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 33.10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आकडेवारीनुसार छावा च्या पहिल्या दिवशी रेकॉर्ड मोडण्यास ‘सिकंदर’ अपयशी ठरला आहे. आज हा सिनेमा कशाप्रकारे कमाई करतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

दरम्यान, बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी स्टार्सपैकी एक असणाऱ्या सलमान खानने अजूनही 500 कोटी रुपयांची कमाई करणारा सिनेमा केलेला नाही. त्यामुळे या सिनेमाकडून त्याला खूप आशा आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगदास यांनी केले आहे.

Sikander Movie Starcast

या सिनेमाचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत. या सिनेमाचे बजेट 180 कोटी रुपये इतके आहे. चित्रपटाने रिलीजपूर्वीच एकूण 165 कोटींची कमाई केली आहे. सलमान खानसोबत रश्मिका मंदान्ना, काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतिक बब्बर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!