Mumbai Indians । आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आमनेसामने येणार असून दोन्ही संघांचा हा या हंगामातील तिसरा सामना असेल. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सचं तर कोलकाता नाईट रायडर्सच अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) नेतृत्त्व करणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे मुंबई इंडियन्सने या हंगामात दोन्ही सामन्यांपैकी एकही सामन्यात विजय मिळवला नाही. तर कोलकाताने दोनपैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे एकीकडे कोलकाता विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करेल तर मुंबई विजयाचे खाते उघडण्यास प्रयत्न करेल.
त्यामुळे वानखेडे स्टेडियममध्ये आज होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघात चुरस पाहायला मिळेल. सलग तीनवेळा पराभव होऊ नये, यासाठी हार्दिक पांड्या आणि त्याचा संघ सर्वतोपरी प्रयत्न आपल्याला करताना दिसेल.
Contents
MI vs KKR IPL 2025 Match Where To Watch On TV?
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.
MI vs KKR IPL 2025 Match Live Streaming Details
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामने डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहेत.
Mumbai Indians Team:
रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.
Kolkata Knight Riders Team:
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, एनरिच नॉर्खिया, मनीष पांडे, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, लवनीथ सिसोदिया, चेतन साकारिया, रहमानउल्ला गुरबाज, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल आणि मोईन अली.
महत्त्वाच्या बातम्या :