Walmik Karad । संतोष देशमुख हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh murder case) वाल्मिक कराड गॅंग पुरती अडकली आहे. सातत्याने याप्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. यामुळे या गँगच्या अडचणीत मोठी भर पडत आहे. अशातच आता याप्रकरणी एक मोठी माहिती समोर आली आहे.
टपरीवर चहा पिणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने 6 डिसेंबरला अवादा कंपनीबाहेर नेमकं काय झाले होते? याची माहिती जबाबात दिली आहे. “मी 6 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता कंपनीच्या गेटवरील सोनवणे यांच्या चहाच्या टपरीवर चहा घेत असताना काही वेळाने तेथे एक काळ्या रंगाची एमएच-44 झेड-9333 या क्रमांकाची स्कार्पीओ कार आली. त्यातून आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule), प्रतिक घुले, सुधीर सांगळेयांच्यासह एक अनोळखी व्यक्ती खाली उतरली,” अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली.
“यानंतर आरोपींनी कंपनीचे सुरक्षा रक्षक अशोक सोनवणे, अमरदिप सोनवणे आणि भैय्यासाहेब सोनवणे यांच्यासोबत गेटमधून आत सोडण्यासाठी भांडण केली. पण सुरक्षा रक्षक त्यांना आत सोडत नसल्याने त्यांनी सुरक्षारक्षकांना शिवीगाळ करायला सुरुवात केली,” असे प्रत्यक्षदर्शी जबाबात म्हणाले.
Eyewitness statement against Walmik Karad
“सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी स्वतःच कंपनीचे गेट उघडून आत प्रवेश केला. काही वेळाने तेथे संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आले. त्यांनी आरोपींना कंपनी बंद करु नका आणि गावातील लोकांना रोजगार मिळू द्या, अशी विनंती केली. सुदर्शन घुले तेव्हा देशमुखांना म्हणाला की, सरपंच तुला बघून घेऊ. तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी त्याने दिली,” असे प्रत्यक्षदर्शीने जबाबात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :