🕒 1 min read
Dhananjay Munde । अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडेंना (Karuna Munde) प्रत्येक महिन्याला दोन लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज अंतिम सुनावणी पार पडली.
पोटगीची रक्कम तुटपुंजी आहे, त्यामुळे ती नऊ लाख रुपये करावी, अशी करुणा मुंडे यांची मागणी आहे. पण धनंजय मुंडे यांनाच कोर्टाने फटकारले आहे. “मुले तुमची मग करुणा मुंडे आई कशा नाहीत? त्या मुलांचे वडील कोण? असा सवाल कोर्टाने उपस्थित केला आहे.
यावर धनंजय मुंडेंच्या वकिलांनी पुन्हा एकदा कोर्टात बाजू मांडली. धनंजय मुंडे यांच्या खऱ्या पत्नी राजश्री मुंडे (Rajshree Munde) आहेत. ते मुलांना स्वीकारत असून त्यांनी करुणा मुंडे यांच्यासोबत लग्न केले नाही, असा युक्तीवाद वकिलांनी केला.
धनंजय मुंडेंचे करुणा मुंडेसोबत झालेले लग्न हे अधिकृत नाही, असे स्पष्टीकरण धनंजय मुंडेंच्या वकिलांनी कोर्टात दिले. पुढे ते म्हणाले की, “करुणा मुंडे यांचे वार्षिक उत्पन्न 15 लाखाच्या जवळपास आहे, त्या इन्कम टॅक्स भरतात,” अशी माहिती वकिलांनी दिली.
Dhananjay Munde, Karuna Munde Alimony Case Court Hearing Arguments
“करुणा मुंडे आर्थिक दृष्ट्या सक्षम असूनही त्यांनी पोटगीसाठी कोर्टात अर्ज केला आहे. त्या स्वतःचा खर्च मॅनेज करत आहे. सतत त्या धनंजय मुंडेंवर वेगवेगळे आरोप करत आहे,” असेही धनंजय मुंडेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या :
- “….तर Santosh Deshmukh यांचा जीव वाचला असता,” जबाबातून धक्कादायक माहिती समोर
- “धनंजय मुंडेंनी सगळ्यांना कॉर्डिनेट केलं,” Anjali Damania यांचा खळबळजनक आरोप
- वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून Sambhajiraje Chhatrapati यांचं बड्या नेत्यांना ओपन चॅलेंज, म्हणाले..









