Share

“मी परळी धनुभाऊंना देऊन टाकली…”; पंकजा मुंडेंचा मोठा निर्णय! आता ‘या’ मतदारसंघावर लक्ष

Pankaja Munde announces she has “given” Parli constituency to Dhananjay Munde and will now focus on developing Malakoli.

Published On: 

Pankaja Munde indirectly target Dhananjay Munde

बीड – राजकारणात नाती आणि समीकरणं कशी बदलतात, याचा एक जबरदस्त नमुना पुन्हा एकदा बीडच्या राजकारणात पाहायला मिळाला आहे. “बहीण-भावाच्या भांडणात परळीचं काय होणार?” हा प्रश्न अनेकांना पडला असतानाच, भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “मी परळी धनुभाऊंना (धनंजय मुंडे) देऊन टाकली आहे, आता परळीची जबाबदारी तेच सांभाळतील,” असं जाहीर करत पंकजाताईंनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

Pankaja Munde Give Parli constituency to Dhananjay Munde

नेमकं काय घडलं?

पंकजा मुंडे यांनी आपल्या पुढच्या राजकीय वाटचालीचे स्पष्ट संकेत दिले. परळीवरचा आपला दावा सोडत त्यांनी आता एका नव्या ठिकाणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे, ते ठिकाण म्हणजे माळाकोळी. पंकजाताई म्हणाल्या, “परळीवरचे प्रेम आता धनुभाऊंना करू द्यावे. परळीची जबाबदारी आता त्यांची आहे. मी आता माळाकोळी सांभाळेन.”

लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचं माळाकोळीवर जिवापाड प्रेम होतं. “साहेबांनी दिलेलं वचन आणि त्यांचं प्रेम यामुळेच माळाकोळीची पाण्याची योजना पूर्ण करणं शक्य झालं,” अशी आठवण पंकजा (Pankaja Munde) यांनी करून दिली.

“परळीपेक्षा कणभर जास्त प्रेम…”

आपल्या नव्या बालेकिल्ल्याबद्दल विश्वास व्यक्त करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “धनंजय मुंडेंनी त्यांच्या मतदारसंघावर (परळी) प्रेम करावं, पण मला विश्वास आहे की माळाकोळी माझ्यावर परळीपेक्षाही कणभर जास्त प्रेम करेल.” पंकजा मुंडेंच्या या विधानामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बीडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. बहीण-भावामधील या ‘तह’मुळे परळीतील राजकीय संघर्ष संपणार की नवी समीकरणं जुळणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही