Share

“आज पुन्हा पोरका झालो…” अजितदादांच्या निधनानंतर धनंजय मुंडे ढसाढसा रडले; म्हणाले, “असं वाटतंय की आता फोन येईल…”

“माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला पोरकं होऊ दिलं नाही, पण आज पुन्हा पोरका झालो,” अशी हृदयद्रावक प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच्या निधनावर दिली आहे.

Published On: 

Ajit Pawar, Dhananjay Munde

बीड – नियतीचा खेळ किती क्रूर असतो आणि तो कधी कोणावर घाला घालेल, हे खरोखरच सांगता येत नाही. महाराष्ट्राचा ‘पहाटेचा सूर्य’ म्हणून ओळखले जाणारे अजित पवार आज आपल्यात नाहीत, यावर कोणाचाच विश्वास बसत नाहीये. पण ज्यांच्या सावलीत राजकीय कारकीर्द बहरली, त्या धनंजय मुंडे यांच्यावर तर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. बारामतीतील भीषण विमान अपघातात अजितदादांच्या निधनाचं वृत्त समजताच धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर झाले.

“माझं सर्वस्व गेलं…”

अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचं नातं जगजाहीर आहे. या घटनेनंतर पहिली प्रतिक्रिया देताना Dhananjay Munde यांचा कंठ दाटून आला होता. ते म्हणाले, “आज पुन्हा पोरका झालो… माझे दादा मला पोरका करून गेले. माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला वडील नसल्याचे कधीच जाणवू दिले नाही. माझं आणि दादांचं नातं मी शब्दांत सांगूच शकत नाही.”

विकासाचा महामेरू हरपला

धनंजय मुंडे यांनी अजितदादांच्या कामाच्या पद्धतीचा उल्लेख करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. “संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी घेऊन झोपणार आणि भल्या पहाटे ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कामाला लागणारा हा नेता होता. वेळेचे नियोजन आणि शिस्त यातून त्यांनी विकासाचा जो दरारा निर्माण केला, तो आता इतिहास जमा झाला आहे,” असं म्हणताना मुंडे भावूक झाले होते.

Dhananjay Munde Emotional Reaction

“अजूनही वाटतं दादांचा फोन येईल…”

सगळ्यात हृदयद्रावक क्षण तो होता, जेव्हा धनंजय मुंडे म्हणाले की, त्यांना अजूनही हे सत्य पचवता येत नाहीये. “दादांचे अकाली निधन ही घटनाच मुळात हृदयाला न पटणारी आहे. आमचे राजकीय अस्तित्व दादांच्या जीवावर होते. त्यामुळे अजूनही असं वाटतंय की, आत्ता दादांचा फोन येईल आणि म्हणतील, धनंजय वेळेवर ये बरका…”

ही प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे पूर्णपणे कोलमडून गेले होते. “त्यामुळे श्रद्धांजली हा शब्दच फुटत नाहीये,” असं म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. देश, राज्य, पक्ष आणि बीड जिल्ह्याची ही कधीही न भरून निघणारी हानी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही