Share

‘माझी अवस्था तुटलेल्या चार्जरसारखी..’, ट्विंकल खन्नाची ‘ती’ पोस्ट चांगलीच चर्चेत!

मेनोपॉजच्या त्रासाबद्दल ट्विंकल खन्नाने प्रथमच केला खुलासा; “तुटलेल्या चार्जरसारखी अवस्था” म्हणत शेअर केला अनुभव.

Published On: 

Twinkle Khanna on Menopause: 'तुटलेल्या चार्जरसारखी अवस्था'; ट्विंकलची पोस्ट चर्चेत!

वयाचा आकडा लपवण्यासाठी जिथे बॉलीवूडच्या अभिनेत्री हजारो खटाटोप करतात, तिथे अक्षय कुमारची पत्नी (Akshay Kumar’s Wife) आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाने मात्र एक धाडसी पाऊल उचललं आहे. स्त्रियांच्या आरोग्याशी निगडित पण चारचौघात बोलला न जाणारा विषय म्हणजे मासिक पाळी बंद होण्याचा काळ अर्थात ‘मेनोपॉज’ (Menopause). या विषयावर उघडपणे बोलताना ट्विंकलने स्वतःची तुलना चक्क एका ‘तुटलेल्या चार्जर’शी केली आहे. तिच्या या रोखठोक वक्तव्याने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

नेहमी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या ट्विंकलने (Twinkle Khanna) इन्स्टाग्रामवर आपले काही ‘नो-मेकअप’ फोटो शेअर केले आहेत. वयाच्या 52 व्या वर्षी आलेल्या अनुभवाबद्दल ती म्हणते, “मेनोपॉज हा माझ्या स्वभावापेक्षाही वाईट आहे. या काळात मला खराब चार्जर असलेल्या फोनसारखं (Phone with broken charger) वाटत होतं.” अंगात त्राण नसणे, मूड स्विंग्ज आणि शरीराची होणारी विचित्र घालमेल तिने या एका वाक्यातून मांडली आहे. दुपारचा सूर्यप्रकाश आणि मेकअप नसलेला चेहरा हेच आता सौंदर्याचं लक्षण असल्याचंही तिने नमूद केलंय.

Twinkle Khanna on Menopause

फक्त रडगाणं न गाता यावर मात कशी करायची, याचा ‘फॉर्म्युला’ही तिने दिलाय. ट्विंकल सांगते, “मी आता माझं वय स्वीकारलं आहे.” सध्या ती नियमित वेट ट्रेनिंग (Weight Training), सकस आहार आणि पुस्तकांमध्ये मन रमवून या कठीण काळाचा सामना करत आहे. स्वतःला स्वीकारणे हेच यावरचं मोठं औषध असल्याचं तिने चाहत्यांना सांगितलंय.

विशेष म्हणजे, ट्विंकलने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) आणि सप्लिमेंट्सबद्दलही भाष्य केलं आहे. मी अजूनही याचा विचार करतेय, पण “कोणतेही सप्लिमेंट्स सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या,” असं आवाहन करायला ती विसरली नाही. एका ‘टॅबू’ विषयावर इतक्या मोकळेपणाने बोलल्यामुळे सध्या नेटकरी तिचं भरभरून कौतुक करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही