Share

T20 World Cup 2026 : पाकिस्तान ‘OUT’, बांगलादेश ‘IN’? विश्वचषकाआधी मोठं ट्विस्ट; भारताशी पंगा महागात पडणार?

टी-20 विश्वचषकाआधी मोठा ड्रामा! पाकिस्तानने बहिष्काराची धमकी दिल्याने बांगलादेशला पुन्हा एन्ट्री मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Published On: 

T20 World Cup 2026: पाकिस्तान बाहेर, बांगलादेशची एन्ट्री? मोठं अपडेट!

🕒 1 min read

क्रिकेटच्या मैदानात शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल हे सांगता येत नाही, पण मैदानाबाहेरचं राजकारण त्याहूनही अधिक अनपेक्षित असतं. T20 World Cup 2026 सुरू व्हायला अवघे काही दिवस उरले असतानाच क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. बांगलादेश बाहेर पडला आणि स्कॉटलंड आला, हे प्रकरण शांत होत नाही तोच आता पाकिस्तानमुळे सगळं समीकरण बदलण्याची चिन्हं आहेत.

सुरक्षेच्या कारणास्तव आपले सामने भारतात नको तर श्रीलंकेत भरवा, अशी मागणी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केली होती. ICC ने ही मागणी धुडकावल्याने बांगलादेशने स्पर्धेवर बहिष्कार टाकला आणि त्यांच्या जागी स्कॉटलंडला (Scotland) संधी देण्यात आली. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) बांगलादेशच्या समर्थनार्थ, भारतासोबतच्या हाय-व्होल्टेज सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे.

T20 World Cup 2026

जर पाकिस्तानने खरोखरच विश्वचषकातून माघार घेतली, तर बांगलादेशला पुन्हा संधी (Re-entry) दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे, अशा स्थितीत बांगलादेशचे सामने त्यांच्या अटीप्रमाणे श्रीलंकेतच खेळवले जातील. त्यामुळे सध्या ‘पाकिस्तान आऊट आणि बांगलादेश इन’ अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

पाकिस्तानच्या या पवित्र्यामुळे चाहत्यांचा गोंधळ उडाला आहे. कारण एकीकडे बहिष्काराची भाषा करणाऱ्या पाकिस्तानने दुसरीकडे आपला 15 खेळाडूंचा संघ (Squad) अधिकृतपणे जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व बाबर आझम किंवा रिझवानकडे नसून सलमान अली आघा (Salman Ali Agha) याच्याकडे सोपवण्यात आले आहे.

पाकिस्तानचा संघ: सलमान अली आघा (कर्णधार), बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, शादाब खान, फखर जमान, सॅम अयुब आणि इतर. महत्त्वाची तारीख ही नियोजित वेळापत्रकानुसार 15 फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला होणार आहे. आता पाकिस्तान मैदानात उतरणार की माघार घेणार, याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही