🕒 1 min read
Ban vs Pak : क्रिकेटच्या मैदानात कधी कोणता राडा होईल आणि खेळाडूंचा पारा कधी चढेल, हे कुणालाच सांगता येत नाही. आता पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या वनडे मालिकेत असाच एक धक्कादायक प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
ढाक्याच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर सध्या दुसरा वनडे सामना खेळवला जात आहे. याच सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज सलमान अली आगा अत्यंत विचित्र पद्धतीने बाद झाला, ज्यामुळे मैदानावरच मोठी वादावादी पाहायला मिळाली.
Salman Ali Agha Run OUT Ban vs Pak 2nd ODI
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव ४७.३ षटकांत २७४ धावांवर आटोपला. या संपूर्ण डावात सलमान आगाचा तो वादग्रस्त रनआऊटच सध्या चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे.
ही संपूर्ण घटना पाकिस्तानी डावाच्या ३९ व्या षटकात घडली. मेहदी हसन मिराज गोलंदाजी करत असताना मोहम्मद रिझवानने चेंडू हलकासा टोलवला. तो चेंडू थेट गोलंदाजाच्या दिशेनेच परत जात होता.
यावेळी नॉन-स्ट्रायकर एन्डला असलेला सलमान क्रीजच्या बाहेर होता. चेंडू थेट सलमानच्या बॅटला लागून मेहदी हसनच्या हातात गेला आणि दोघांची जोरदार धडकही झाली. चेंडू ‘डेड’ झाला असावा, या समजुतीने सलमान चेंडू उचलण्यासाठी खाली वाकला.
मात्र, मेहदी हसनने क्षणाचाही विलंब न लावता चेंडू स्टंप्सवर मारला आणि जोरदार अपील केली. त्यामुळेच Ban vs Pak 2nd ODI च्या या सामन्यात अंपायरने नियमांनुसार सलमानला थेट बाद घोषित केलं.
Crucial moment! Mehidy Hasan Miraz removes Salman Agha with a brilliant run-out. ⚡🏏#BCB #Cricket #Bangladesh #Pakistan #ODI pic.twitter.com/N0inKkZVwz
— Bangladesh Cricket (@BCBtigers) March 13, 2026
या निर्णयानंतर सलमानचा संताप पूर्णपणे अनावर झाला. मैदानाबाहेर जाताना त्याने आधी हातमोजे फेकले आणि नंतर हेल्मेटही जमिनीवर आपटलं. दुसरीकडे, पाकिस्तानचा कर्णधार रिझवानदेखील बांगलादेशच्या खेळाडूंशी हुज्जत घालताना दिसून आला.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘लहान मुलं गुदमरतायत…’, BMC वर संतापली दीपिका पादुकोण; म्हणाली मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं…..
- काव्या मारनने पाकिस्तानी खेळाडूवर उधळले कोट्यवधी; BCCI ची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…..
- सोने-चांदीच्या दरात अचानक उलथापालथ; १० ग्रॅमची किंमत पाहून थक्क व्हाल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











